India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

देशातील पहिली पॉड टॅक्सी या शहरात धावणार; अशी राहणार तिची वैशिष्ट्ये

India Darpan by India Darpan
February 17, 2023
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तीर्थनगरी अशी ओळख असलेल्या हरिद्वार येथून देशातील पहिली पॉड टॅक्सी संचालित होणार आहे. या संदर्भात उत्तराखंड सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार, या पॉड टॅक्सीचा मार्ग सुमारे २०.७४ किलोमीटरचा असणार आहे.

हरिद्वारला कुंभनगरी असेही म्हणतात. त्यामुळे येथील वाहतुकीची आधुनिक साधने विकसित करण्यासाठी उत्तराखंड मेट्रो कॉर्पोरेशनने येथे पॉड टॅक्सी चालवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हरिद्वारमधील ज्वालापूरच्या टोकापासून भारत माता मंदिर आणि दक्ष प्रजापती मंदिरापासून लक्‍सर रोडपर्यंत एकूण ४ कॉरिडॉर बनवले जाणार आहेत. या कॉरिडॉरमध्ये २०.७४ किलोमीटर लांबीचा ट्रॅक असेल आणि येथे पॉड टॅक्सी चालवल्या जातील. यासाठी उत्तराखंड मेट्रो कॉर्पोरेशनने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर यासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. या मार्गावरील प्रमुख स्थानकांमध्ये सीतापूर, ज्वालापूर, आर्य नगर, रामनगर, रेल्वे स्टेशन, हरकी पौडी, खडखडी, मोतीचूर, शांतीकुंज, भारत माता मंदिर, गणेशपुरा मंदिर, जगजीतपूर आणि लक्सर यांचा समावेश आहे. हा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पात भूसंपादनाची फारशी गरज भासणार नाही.

इतर शहरांचाही विचार
भारतातील पॉड टॅक्सीचा हा पहिला वापर असेल. या प्रकल्पाच्या यशावर अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे उत्तराखंड सरकारचे अधिकारी सांगतात. त्याच वेळी, त्याचे यश देशातील उर्वरित शहरांसाठी एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून काम करेल आणि नव्या संकल्पना भारतभर रावबण्यास मदत होईल असेही सांगितले जात आहे.

Indias First Pod Taxi Will Run In this City


Previous Post

कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी महाउत्सव वादात! महापालिका करणार चौकशी

Next Post

महाशिवरात्रीला या मंदिरात बेल, फुल अर्पण करण्यासह जलाभिषेकास परवानगी; सरकारचा निर्णय

Next Post

महाशिवरात्रीला या मंदिरात बेल, फुल अर्पण करण्यासह जलाभिषेकास परवानगी; सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

साक्षी गर्गे बनली आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच; नाशिकला प्रथमच बहुमान

March 28, 2023

मनमाड जवळील लोणच्या डोंगरावर पेटला वणवा; वनविभागाने लावलेली हजारो झाडे जळून खाक

March 28, 2023

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

March 28, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group