India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तयार रहा! राज्याच्या वनविभागात तब्बल २ हजार ७६२ जागांची भरती

India Darpan by India Darpan
January 20, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0
दीपाली चव्हाण आत्महत्येचा परिणाम; राज्य वनविभागात मोठे फेरबदल (बघा बदल्यांची यादी)
0
SHARES
1k
VIEWS
WhatAppShare on FacebookShare on Twitter

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पर्यावरणपूरक पर्यटन (इको टुरिझम) अंतर्गत कामांना गती देऊन वन विभागातील 2 हजार 762 रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात वन विभागातील रिक्त पदे तसेच इको टुरिझम प्रस्तावासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीला नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, निसर्ग पर्यटन विकास मंडळांतर्गत इकोटुरिझमचे प्रस्ताव वन विभागाकडे आहेत या प्रस्तावासाठी निधीची आवश्यकता आहे हे लक्षात घेता याबाबत वित्त विभागाकडे वन विभागाने मागणी करावी. नांदेड जिल्ह्यातील टिटवी निसर्ग पर्यटन केंद्र, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मिरवडी, अकोला जिल्ह्यातील कुटासा, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडगांव, पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे वाल्हा येथील श्री भवानीमाता परिसर, पुणे जिल्ह्यातील शंभु महादेव हरेश्वर मंदिर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिंरोंभा येथील अप्पर वर्धा धरण, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील संजिवनी बेट, पुणे जिल्ह्यातील वाडे बिल्होई, धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगला, वसई येथील तुंगारेश्वर देवस्थान या प्रलंबित प्रस्तावाबाबत वन विभागाने केलेल्या कार्यवाहीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

राज्यमंत्री श्री. भरणे यांनी वनसरंक्षक व सर्वेक्षक संवर्गातील रिक्त पदे,पशुसंवर्धन सहायक आयुक्त, उपायुक्त गट अ पदभरती, वनपाल संवर्गातून वनक्षेत्रपाल संवर्गात तदर्थ पदोन्नती देणे, शाखा अभियंता या संवर्गातून उपवनअभियंता या संवर्गात तदर्थ पदोन्नती देणे, वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, वन अधिकाऱ्यांच्या विभागीय परीक्षा नियमात सुधारणा करणे, वनपाल व वनरक्षक संवर्गाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, वन विभागात जलद कृती दल स्थापन करण्याच्या प्रस्तावासंदर्भातील सद्यस्थिती, वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाची राज्यस्तरीय ज्येष्ठता सूची, वनसंरक्षणाचे काम करताना मृत्यू झालेले अधिकारी कर्मचारी यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत देण्याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

Previous Post

ओमिक्रॉनचा संसर्ग सुरू असूनही ऐतिहासिक घोषणा; ब्रिटनमध्ये आता मास्क सक्ती नाही

Next Post

राज्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता? थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक

Next Post
रविवारचा कॉलम – तरंग – गोंधळ!

राज्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता? थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक

ताज्या बातम्या

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

May 23, 2022
चालबाज चीनचा हा डाव उघड

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

May 23, 2022
कोरोना आणि सोशल मिडिया

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

May 23, 2022
हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि शेठजी

May 23, 2022
….आता रोजचे वाढदिवसही कळेल

आज आहेत या मान्यवरांचे वाढदिवस – २४ मे २०२२

May 23, 2022
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस वाचा, २४ मे चे राशिभविष्य

May 23, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group