शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आली समीप घटिका! LICच्या IPOची प्रतीक्षा संपली

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2021 | 10:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
lic ipo

मुंबई – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) च्या आयपीओची अनेक जण डोळ्यात तेल घालून प्रतिक्षा करीत आहेत. या सर्वांसाठी एक महत्त्वाची वार्ता आङे. पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात एलआयसीच्यावतीने आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी आहे. येत्या २ ते ३ महिन्यात या संधीचा अनेकांना लाभ घेता येणार आहे.

डिसेंबरमध्ये कधी होणार?
एका अहवालानुसार, सदर मसुदा IPO प्रॉस्पेक्टस डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजार नियामकाकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापपर्यंत एलआयसीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, मसुदा सादर झाल्यानंतर सुमारे एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत एलआयसीचा आयपीओ जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

आयपीओ (IPO) म्हणजे काय?
आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग होय. एखादी कंपनी पहिल्यांदा कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची संधी सामान्य जनतेला देते, तेव्हा ही प्रक्रिया आयपीओद्वारेच पूर्ण होते. आयपीओ लाँच आणि शेअर्सचे वाटप झाल्यानंतर कंपनीची यादी केली जाते. साधारणपणे कोणत्याही कंपनीच्या आयपीओची सुरुवातीची किंमत कमी असते. तथापि, शेअर बाजारात लिस्टिंग केल्यानंतर, त्याच्या शेअरच्या किमती बाजारानुसार वाढत किंवा कमी होत राहतात.

गुंतवणूक कशी करावी?
आयपीओच्या दृष्टीकोनातून २०२१ हे वर्ष खूप चांगले मानले जात आहे. कारण यावर्षी अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले आहेत. येत्या काही दिवसात सुमारे अनेक कंपन्या त्यांचा IPO लाँच करणार आहेत. प्रत्येक कंपनी गुंतवणूकदारांसाठी काही कालावधीसाठी आयपीओ खुली ठेवते. साधारणपणे हा कालावधी ७ दिवसांचा असतो. या दरम्यान, गुंतवणूकदार कंपनीच्या वेबसाइटवर किंवा नोंदणीकृत दलालीद्वारे त्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतो.

IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? बघा, तज्ज्ञ काय सांगताय https://t.co/omuOOfz25f

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) November 18, 2021

अँकर गुंतवणूकदारांशी चर्चा
एका अहवालानुसार, बँकर्स पुढील आठवड्यात LIC च्या IPO मध्ये संभाव्य अँकर गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात करतील. तसेच बँकर्सना हे निश्चित करायचे आहे की, देशातील सर्वात मोठ्या शेअर विक्रीसाठी पुरेशी मागणी आहे काय ? अर्थ तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १०० जागतिक गुंतवणूकदारांच्या नावांची यादी १० बँकांशी शेअर करण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठा IPO
एलआयसीचा हा देशातील सर्वात मोठा IPO मानला जात आहे. याद्वारे सरकार LIC मधील १० टक्क्यांहून अधिक स्टेक विकू शकते. जागतिक गुंतवणूकदारांनाही या IPO मध्ये अँकर गुंतवणूकदार म्हणून प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारला या IPO मधून एक लाख कोटी रुपये उभे करायचे आहेत. यापुर्वी पेटीएम हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ मानला जातो. पेटीएमच्या आयपीओमधून कंपनीने १८ हजार ६००कोटी रुपये उभे केले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे तालुकानिहाय स्थिती

Next Post

राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान ‘कौमी एकता सप्ताह’; काय आहे तो ?

Next Post
kaumi ekata saptah

राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान ‘कौमी एकता सप्ताह’; काय आहे तो ?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011