लासलगाव – एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या अडीच महिन्यापासून सुरु असलेल्या संपामुळे कर्मचाऱ्यांचा घरातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून लासलगाव येथील जिल्हा परिषद सदस्य डी के नाना जगताप व लासलगाव बाजार समितीच्या सभापती सौ सुवर्णा ताई जगताप यांच्यावतीने लासलगाव बस आगारातील सुमारे २६ कर्मचाऱ्यांना घरगुती किटचे वाटप करण्यात आले. आज सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास श्री गणेश मंदिर येथे या कर्मचाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे सोमवारी गणेश मंदिर येथे डी.के. नाना जगताप ,सौ सुवर्णा ताई जगताप , नाशिक येथील नाशिक मर्चंट को ऑप बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाशन दायमा,भारतीय जनता पक्षाचे संतोष पडवळ राजेंद्र चाफेकर, श्री गणेश मंदिर चौरीटेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष बापूसाहेब लचके सुनील सानप तसेच सौ स्मिता कुलकर्णी, सौ ज्योती शिंदे, सौ रुपा केदारे व सौ. शैलजा भावसार दत्तात्रय माळी,अभिजित लचके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमानंतर सुवर्णा ताई जगताप यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप दीर्घकाळ सुरू असल्याने त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सोडवावा अशी मागणी केली तर कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी केल्यानंतर एस टी. कर्मचारी बांधवांना शिधावाटप केल्याबद्दल गौतम जाधव यांनी आभार मानले.