नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी यांच्या वतीने सोमवार १० ऑक्टोबर २०२२ रोजी सायं. ६.१५ वाजता कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात अलोन इन बर्लिन Alone In Berlin (जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड. 2016 चित्रपट कालावधी : 103 मिनिटे) हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक व्हिंसेंट पेरेज हे असून प्रमुख भूमिका इमा थॉम्प्सन, ब्रेंडन ग्लिसन. यांची आहे.
मागील वेळेस दाखविण्यात आलेल्या ए शॉर्ट फिल्म अबाऊट किलिंग या मराठी उपशीर्षके असलेल्या चित्रपटाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिलात याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. मात्र आता अनेक रसिकांच्या आग्रहानुसार पुन्हा एकदा मराठी उपशीर्षके असलेला अलोन इन बर्लिन चित्रपट दाखवतांना आम्हाला आनंद होत आहे. जास्तीत जास्त चित्रपट रसिकांनी या चित्रपटाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.