India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा; यंदाचे हे आहे आकर्षण, बघा, सर्व नियोजित कार्यक्रमांची यादी

India Darpan by India Darpan
January 2, 2023
in साहित्य व संस्कृती
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण आरती किर्लोस्कर (महोत्सव निमंत्रक), गौरी किर्लोस्कर (एम.डी. के.ओ.इ.एल.), राजेंद्र देशपांडे (महोत्सव अध्यक्ष), आनंद चितळे (महोत्सव ’फेसिलिटेटर), डॉ. गुरुदास नूलकर (’क्युरेटर) आणि वीरेंद्र चित्राव (’महोत्सव संयोजक) यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. ऑनलाइन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येत्या 20 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

यंदाचा ’वसुंधरा सन्मान’ पुरस्कार कृष्णा मेकॅन्झी, ’पर्यावरण पत्रकारीता’: रोनक गज्जर, ’फिल्म मेकर’: डि. डब्ल्यु. इको इंडिया यांना देण्यात येाक आहे. शुक्रवार दि. 20 जानेवारी पासून सोमवार दि. 23 जानेवारी या कालावधी मध्ये ऑनलाइन पद्धतीने हा महोत्सव होणार आहे. भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव हा या विषयावर लक्ष केंद्रित करणारा पहिला महोत्सव असेल.

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (KVIFF) 15 वर्षांपूर्वी किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांनी सुरू केला.
पर्यावरणाशी निगडित चित्रपट प्रसारित करण्याबरोबरच वन्यजीवन, ऊर्जा, हवा, पाणी आणि पर्यावरण यांच्या अनुषंगाने चालणारे विविध उपक्रम व चित्रपट यांना स्थान देणारा ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ हा एकमेवाद्वितीय असा महोत्सव आहे.
हा महोत्सव म्हणजे निसर्गाला जाणून घेण्याचा आणि पर्यावरणाशी निगडित विविध समस्यांचा, प्रश्नांचा आणि पैलूंचा अभ्यास व विश्लेषण करण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. आपला अमूल्य निसर्गवारसा जतन करण्यासाठी, प्रभावी आणि अर्थपूर्ण संवाद व देवाणघेवाणीसाठी एक सामाईक व्यासपीठ उन्नत करण्याची संधी हा चित्रपट महोत्सव आपल्याला बहाल करतो.

7 राज्यांतील 30 शहरांमधून आजतागायत आम्ही 260 पेक्षा जास्त महोत्सव आयोजित केले आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे मागच्या वर्षीचा महोत्सव डिसेंबर महिन्यात ऑनलाइन आयोजित केला होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ह्या आव्हानात्मक परिस्थितचे रूपांतर बदल घडवून आणण्याच्या संधीत करण्याच्या उद्देशाने यावर्षीपासूनचा किर्लोस्कर वसुंधरा महोत्सव ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने आयोजित करणार आहोत. ज्यामुळे महोत्सव जागतिक स्तरावर पोहचविण्यास मदत होईल.
दुर्दैवाने कोरोना महामारीच्या संकटामुळे जगातले सर्व व्यवहार ठप्प झाले, रस्ते रिकामे झाले, संस्था ओस पडल्या आणि गर्दी लुप्त झाली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ह्या आव्हानात्मक परिस्थितचे रूपांतर बदल घडवून आणण्याच्या संधीत करण्याच्या उद्देशाने किर्लोस्कर वसुंधरा हा 16वा जागतिक आणि ऑनलाइन महोत्सव आयोजित करत आहेत.

महोत्सवाचा विषय : ’ सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’
कोविडमुळे आपल्या आर्थिक आणि औद्योगिक प्रणालींचा कमकुवतपणा उघडकिस आला. जगातील सर्व हरितगृह उत्सर्जन पृथ्वीच्या वातावरणात बदल घडवत आहेत. दुष्काळ, वादळे, पूर, समुद्राची वाढती पातळी यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे मानवांचे बळी जात आहेत, अधिवास व वस्त्या नष्ट होत आहेत आणि अर्थव्यवस्था खिळखिळ्या होत आहेत.
ज्ञानपरंपरा आणि सहकार्यात्मक प्रयत्नांनी हवामान बदलांवर मानवाने मात केली पाहिजे. त्याचप्रमाणे शाश्वत भविष्यासाठी एकत्रितपणे आपली पर्यावरणीय फुटप्रिंट्स कमी करणे आवश्यक आहे.

सर्वांना पोषक अन्न पुरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना आपल्या अन्न प्रणालींकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाला 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य (मिलेट्स) वर्ष म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्ताव दिला. हि तृणधान्ये तीव्र हवामानातील बदलांना सहन करु शकतात, त्यांना पाणी कमी लागते आणि गहू तसेच भातामध्ये नसलेली पोषक द्रव्ये त्यांच्यात असतात.
16 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या समस्यांचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी ज्ञान, संशोधन आणि अनुभवांचा प्रसार केला जाईल. प्रेक्षकांना त्यांची जबाबदारी लक्षात येण्यासाठी, त्यांनी योग्य निर्णय घेण्यासाठी आणि शाश्वत विकासा करिता बदल स्विकारण्यासाठी आपण जागतिक व स्थानिक पातळीवरील छोट्या मोठ्या कृतींचा शोध घेऊ.

महत्वाचे विषय :
Nutritious Food : Cultivars, Multi-cropping, Crop rotation, Urban farming, Agro climatic zones, Irrigation, Soil nutrition, Bio diversity, Cropping practices, Chemical farming, Forest foods, Industrial farming, Animal farming, Nutrition and Immunity.
Flourishing Nature : Food chains, Food web, Wildlife, Biodiversity, Forests, Mountains, Climate, Global Public Goods, Natural resources, Eco systems, Water, Deserts.
Health of Society : Zoonotic Diseases, Carbon footprints, Water footprints, Biodiversity, Eco system, Water, Soil, Air, Ecological footprints.

महोत्सवाची वैशिष्ट्ये :
या वर्षीचा महोत्सव 4 दिवसांचा असेल : (20 ते 23 जानेवारी) दररोज 3.30 तासांचे प्रक्षेपण असेल.
रोजचे प्रक्षेपण सकाळी 11 ते दुपारी 2.30 (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
रोजचे पुनर्प्रक्षेपण सायं. 7 तेरात्री 10.30 (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
महोत्सवास प्रवेश विनामुल्य असून नावनोंदणी बंधनकारक आहे.
यावर्षी भारतातील 20 शहारांत महोत्सव ऑफलाइन पध्दतीने आयोजित करण्यात येईल.
आपण खातो ते अन्न, भोवतालच्या निसर्गाचे आरोग्य आणि निरोगी समाज यांचं एकमेकांशी असलेलं नातं विज्ञानानं ओळखलं आहे. या वर्षीच्या ऑनलाइन महोत्सवात, उद्घाटन समारंभ, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, वसुंधरासन्मान (6 जणांना), चर्चासत्रे, निसर्गसंवाद, चित्रपट, दृक्श्राव्य व्याख्याने आणि समारोप समारंभ इ.

सहभागींना या क्षेत्रात झालेली नवी संशोधने समजतील. त्यातूनच त्यांना सभोवतालच्या निसर्गाची अवस्था सुधारण्यासाठी अमलात आणता येणार्या अनेक मार्गांचा परिचय होईल, तसेच आपली जीवनशैली आरोग्यदायी करण्याच्या दिशेने करण्याजोगे बदल आणि नवी कौशल्ये यांचा जवळून परिचय होईल.
प्राप्त झालेली ही नवी समज आणि ज्ञानामुळे नव्या रोगांचा सामना करण्याच्या उपाययोजनांचे आकलन तर होईलच, शिवाय शाश्वत जीवनासाठी निसर्गाच्या सेवा मिळत राहाव्यात, संसाधनांनी समृद्ध निसर्ग राखता यावा याकरिता करण्याच्या उपाययोजनांना चालना मिळेल.
BAIF, Down to earth, DW Eco India (German), The Better India, Black Ticket Films, The Source Project (U.K.), Mongabay India (U.S.) आणि Saffron Trail हे महोत्सवाचे Knowledge Partners आहेत.

महोत्सवामध्ये 100 पेक्षा जास्त फिल्म्स प्रदर्शित करण्यात येणार असून त्यांना महोत्सवाचे सल्लागार डॉ. गुरुदास नूलकर, संजय पाटील, डॉ. राजश्री जोशी, डॉ. मंदार दातार, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, स्वप्नील कुंभोजकर आणि आरती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
महोत्सवा दरम्यान पत्रकार संघ नवी पेठ, पुणे येथे रोज दु. 2 ते दु. 4 या वेळेत पत्रकार आणि विशेष आमंत्रितांसाठी फिल्म्स प्रदर्शन आणि तज्ञांशी संवाद साधण्यात येणारआहे.

छायाचित्र प्रदर्शन :
छायाचित्र प्रदर्शन : महोत्सवात ऑनलाईन प्रदर्शित करण्यात येईल.
विषय : ’ एंचँटिंग इंडिया’(Enchanting India)
भारतातील अनेक प्रसिध्द छायाचित्रकारांना या प्रदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आहे आहे. ध्रितीमन मुखर्जी, गौतम पांडे, सचिन राय, गणेश शंकर, गिरी कावळे, कल्याण वर्मा, सुधीर शिवराम, दिनेश कुंबळे, संदेश कादूर, धर्मेंद्र खंडाल, शिवशंकर बांगर, संग्राम गोवर्धने, जेनी मारीया, शांतनू प्रसाद, रिपन बिस्वास, संदिप धुमाळ, सुहास नलावडे, गणेश बागुल, अजय सोनारीकर, डॉ. आनंद बोरा, डॉ. व्यंकटेश मेतन, मंदार घुमरे, रोनक गज्जर, शेखर नानिवडेकर, योगेश पुराणिक, अनिश अंधेरीया, विकास यादव, प्रशांत खारोटे यांची दर्जेदार छायाचित्रे पहाणे हा एक अनोखा आनंद असणार आहे.
महोत्सवात चारही दिवस हे प्रदर्शन पाहता येईल.

नावनोंदणी :
जगभरातील श्रोत्यांसाठी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑनलाइन प्रसारित केला जाणार आहे.
फक्त नावनोंदणी करून या महोत्सवात तुम्ही सहभागी होऊ शकता.
पुढील लिंकद्वारा नोंदणी करून आपण संपूर्ण महोत्सवात सहभागी होऊ शकता.
bit.ly/kviff23
Kirloskar Vasundhara Film Festival 2023 Announcement


Previous Post

आक्रमक शेतकऱ्यांपुढे प्रशासन झुकले; अखेर शेतीच्या वीजपुरवठ्याबाबत झाला हा निर्णय, त्या अधिकाऱ्याही होणार उचलबांगडी

Next Post

सगळीकडे नुसताच गोंगाट… या ध्वनी प्रदूषणाचे करायचे तरी काय? यावर उपाय काय आहे?

Next Post

सगळीकडे नुसताच गोंगाट... या ध्वनी प्रदूषणाचे करायचे तरी काय? यावर उपाय काय आहे?

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group