डांगसौंदाणे (ता. सटाणा) – शेती पंपाला वीज नियमानुसार आठ तास विद्युत पुरवठा देणे बंधनकारक असताना गेले तीन वर्ष डांगसौंदाणे चे तळवाडे फिडर ,कंधाने फिडर, व निकवेल फिडर वर रोज फक्त चार तास थ्री फेज विद्युत पुरवठा मिळत असल्याने या भागातील शेतकरी हवालदील झाला आहे. वेळोवेळी निवेदने ,आंदोलने व उपोषण करूनही मार्ग निघत नसल्याने आज संतप्त शेतकऱ्यांनी डांग सौंदाणे उपकेंद्रासमोर बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले होते.
शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल घेत सटाणा विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांनी डांगसौंदाणे येथे येत शेतकऱ्यांना दोघा फिडर वर विभागून सहा सहा तास दिवसा वीज पुरवठा देण्याचा शब्द दिला या मुद्द्यावर शेतकरी नाराज असल्याने दुपारी बागलांनचे आमदार दिलीप बोरसे यांनी उपोषणकर्त्यांना भेट घेत शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली. उपोषणकर्ते शेतकरी आक्रमक असल्याने कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांनी आमदार बोरसे यांच्यासमोर शेतकऱ्यांना सहा तास वीज पुरवठा सुरळीत देण्याचा शब्द दिला व स्थानिक अभियंता दीपक सोनवणे यांची तात्काळ बदली करण्याचा शब्द आमदार बोरसे यांना दिल्याने संबंधित शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
आगामी काळात निरपुर येथे पाच केव्ही चा विद्युत ट्रांसफार्मर बसविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेऊन आदिवासी भागातील या वीज उपकेंद्राची समस्या सोडवण्याचा शब्द आमदार दिलीप बोरसे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना व स्थानिक लोकप्रतिनिधींना दिला उपोषण करते जास्त आक्रमक असल्याने आज कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांची शेतकऱ्यांना उत्तर देताना मोठी दमछाक झाली.
या उपोषणाला डांगसौंदाणे च्या सरपंच सिंधुबाई निकम बाजार समितीचे कंधाने येथील संचालक संजय बिरारी व वसाका चे माजी संचालक अमृता बिरारी डांगसौंदाणे ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ बोरसे, रवींद्र सोनवणे ,डॉ सुधीर सोनवणे, कैलास केले, कडू सोनवणे विजय सोनवणे ,राजेंद्र सोनवणे, महेंद्र सोनवणे ,साहेबराव बोरसे ,रघुनाथ पवार, संतोष परदेशी, विजय बैरागी ,उदय सोनवणे मनोहर सोनवणे ,अंबादास सोनवणे, प्रदीप सोनवणे, देवेंद्र सोनवणे ,सुनील वाघ, नंदलाल बोरसे, अनंत सुलक्षण ,किरण बिरारी, हेमत बिरारी, सतीश सोनवणे, गोपाळ चिंचोरे ,किशोर चिंचोरे, विवेक गौतम, बापू बिरारी, आदींसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपोषणाला बसल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती उपोषण स्थळी सटाणा पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार पोलीस हवालदार जयवंत सिंग सोळंकी, सागर बेलुस्कर, पोलीस हवालदार चौरे, शिरसाठ, आदींनी उपोषण स्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवला होता.
Farmer Agitation Satana Taluka Agriculture Electricity Supply
Dangsaundane