नाशिक – प्रशासनात काम करत असतांना समाजातील विविध व्यक्तीरेखा आपल्या कवितेतून मांडणारे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांचा दौलत हा कवितासंग्रहाचा साहित्य संमेलनात प्रकाशित झाल्यानंतर त्याला अनेकांनी पसंती दिली आहे. प्रशासनातल्या अधिका-यांचा हा कवितासंग्रह कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त करणारा आहे.
साहित्य संमेलनातील सुप्रसिद्ध कवी चंद्रकांत महामिने पुस्तक प्रकाशन मंच येथे संमेलनाचे संयोजक विजयकुमार मिठे, रवींद्र रनाळकर, प्रियंका साळुंके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साळुंके यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर या कवितासंग्रहाला अनेकांनी दाद दिली. साळुंके यांचे बालपण एका छोट्याशा तेलखेड नावाच्या गावामध्ये गेले. तेथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी घरांची माणसे सुशिक्षित होते. त्याकाळी आई साक्षर व वडील त्यावेळची मॅट्रिक पास झालेले. त्यामुळे साळुंकेना लहानपणापासून शिक्षणाचे व संस्काराचे धडे मिळाले. त्यातच त्यांना कविता लिहण्याची ओढ लागली. मनात घातलेल्या या पिंगाने त्यानंतर अनेक चांगल्या कविता त्यांनी कागदावर रेखाटल्या. पण, प्रशासनात काम करतांना तसेच समाजात वावरत असतांना त्यांना अनेक अनुभव आले. त्यानंतर त्यांनी नंतर तेचे कवितेत मांडले. माणसाच्या कतृत्वाचा समाजासाठी कसा उपयोग व्हायला पाहिजे हे सुध्दा त्यांच्या कवितेत सहज दिसतो. त्यामुळे त्यांच्या कविता मनाला भिडणा-या आहे. त्यामुळे हा कवितासंग्रह सर्वांनी वाचावा असाच आहे.
असा आहे नोकरीचा प्रवास
साळुंके यांचे पूर्व माध्यमिक शिक्षण येवदा यागावी झाले. त्यानंतर ते अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालय येथे कृषी पदवीधर झाले. पदवी मिळवल्यानंतर त्यांना अन्न व औषध प्रशासन या विभागात नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांची अन्न निरीक्षक म्हणून सुरु नियुक्ती झाली. आता ते नाशिक येथे सह आयुक्त म्हणून कार्यरत आहे.