लासलगाव – भारताचे सिडीओ बिपिन रावत यांच्यासह शहीद अधिकारी वर्गांना लासलगावकरांच्या वतीने आज कॅन्डल मार्च काढून ग्रामपंचायत कार्यालयासमोर भावपूर्ण आदरांजली देण्यात आली. आज सायंकाळी सहाच्या सुमारास लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनेश नाईक यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर बापू शेळके तसेच प्राध्यापक वर्ग यांच्यासह एन सी सी छात्र व युवती छात्र यांनी लासलगाव महाविद्यालय येथून ते लासलगाव ग्रामपंचायत. कार्यालय या दरम्यान पेटत्या मेणबत्त्या घेऊन बिपिन रावत यांच्या सह हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या अधिकाऱ्यांना मेणबत्त्या लावून दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच अफजल भाई शेख ,काँग्रेसचे नासिक जिल्हा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष अनंतराव होळकर डॉक्टर विकास चंदर संतोष ब्रम्हेचा,रामनाथ शेजवळ,किशोर गोसावी,लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाचे प्राचार्य विश्वास पाटील, पर्यवेक्षक गांगुर्डे, लासलगाव ग्रामपंचायत कर्मचारी तसेच लासलगाव येथील मान्यवर उपस्थित होते. यावेळी एन सी सी चे प्रमोद पवार व लासलगाव महाविद्यालयाचे प्राध्यापक किशोर गोसावी यांनी लासलगावकर नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.