कळवणच्या इनरव्हील क्लबचे कार्य कौतुकास्पद – सौं जयश्री पवार
कळवण – कळवणसारख्या ग्रामीण व आदिवासी भागात गेल्या अनेक वर्षांपासून इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आरोग्य आदी सार्वजनिक क्षेत्रात होत असलेले काम प्रेरणादायी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी व्यक्त केले .
इनरव्हील क्लब ऑफ कळवणच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ नाकोडा येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार होत्या . प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्षा सुनीता पगार उपस्थित होत्या . जयश्री पवार पुढे म्हणाल्या की , इनरव्हील क्लबने सेवाभावी वृत्ती जोपासली असून तळागाळातील महिला , विद्यार्थी तसेच इतर घटकांसाठी रोटरी क्लब , इनरव्हील क्लबने चांगले काम उभे केले आहे. पुढील काळातही क्लबच्या माध्यमातून सदस्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन सौं. जयश्री पवार यांनी केले .
२०२१-२२ या वर्षासाठी कळवण इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सौं .नयना पगार तर सेक्रेटरीपदी सौं निर्मला संचेती,उपाध्यक्षपदी सौं स्मिता खैरनार,आएएसओ सौं मंजुषा देवघरे , ट्रेझरर शैला खैरनार , सीसी निशा वालखडे यांची निवड झाली असल्याने त्यांनी पदभार स्वीकारला . मावळत्या अध्यक्षा सौं स्नेहा मालपुरे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल विलास शिरोरे, उद्योजक संजय बगे, धनलक्ष्मी पतसंस्था संस्थापक दीपक महाजन, रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश भामरे यांनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक माजी अध्यक्षा सौं मीनाक्षी मालपुरे यांनी केले. सूत्रसंचलन सौं सुचिता रौंदळ यांनी केले तर सौं निर्मला संचेती यांनी आभार मानले.
……..