इंडिया दर्पण – हास्य षटकार – नेहा तिसऱ्यांदा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी जाते
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नेहाने दोनदा मुलाखत दिली.
पण ती नापास झाली.
अखेर तिसऱ्यांदा ती मुलाखतीसाठी जाते.
अधिकारी : तुम्ही ड्रायव्हिंग करीत असताना
एका बाजूला तुमचा नवरा आणि
दुसऱ्या बाजूला तुमचा भाऊ असेल
तर तुम्ही काय माराल?
नेहा : नवरा
अधिकारी (अतिशय केविलवाण्या आवाजात) : अहो मॅडम,
मी तुम्हाला तिसऱ्यांदा सांगतोय की,
तुम्ही ब्रेक माराल!
– हसमुख