India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

होळीत अश्लील वर्तन झाल्यानंतर जपानी तरुणीने प्रथमच दिली ही प्रतिक्रीया (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
March 12, 2023
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जपानहून विशेषत्वाने होळीचा सण साजरा करण्यासाठी भारतात आलेल्या एका जपानी मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. या प्रकाराने ती मुलगी प्रचंड दहशतीत असून तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार एका व्हिडिओमुळे पुढे आला आहे.

भारतात होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. विशेषत: उत्तर भारतात होळीला सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मथुरा, काशी, वाराणसीप्रमाणेच दिल्ली येथेही होळीचा सण धुमधडाक्यात साजरा होतो. या निमित्त अनेक विदेशी पर्यटक भारतात येत असतात. पीडित तरुणीदेखील होळीचा सण साजरा करण्यासाठी भारतात आली होती. धुळवडीच्या दिवशी तिला रंग लावण्याच्या बहाण्याने तीन तरुणांनी तिच्याशी अश्लील वर्तन केले.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जपानी तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत कुठेही तक्रार दिलेली नाही. मात्र, पोलिसांनी त्या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेऊन कलम ३५४ अंतर्गत एफआयआर नोंदविली आहे. ही मुलगी पहाडगंज या ठिकाणी थांबली होती. तिथे होळी खेळत असतानाच तिच्यासोबत गैरप्रकार घडला. त्या घटनेचा व्हिडिओ स्वत: मुलीनेच ट्विट केला. तो व्हिडिओ बराच व्हायरल झाला. त्यानंतर तिने तो स्वत:च्या अकाउंटवरून डिलिट केला. ही जपानी तरुणी आता बांगलादेशला गेली आहे.

…म्हणून केला व्हिडिओ डिलिट
भारतीय किती संस्कृती किती चांगली आहे. येथील सण-उत्सव कशाप्रकारे साजरे होतात, हे सांगण्यासाठी मी भारतात आले होते. तसा व्हिडिओदेखील बनवायचा होता. पण, त्यादिवशी माझ्यासोबत जे घडले त्यामुळे मी खूपच घाबरून गेले. मी त्या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा मलाच नावे ठेवणाऱ्या कॉमेंट्स त्यावर आल्या. परिणामत: मी माझ्या अकाऊंटवरून पोस्ट केलेला व्हिडिओ डिलिट केला, असे त्या तरुणीचे म्हणणे आहे.

Japanese Girl gets Physically harassed, egged and groped on the ass by local males during Holi celebrations in India. pic.twitter.com/Y9dYmLpLXR

— Ⓢ𝕌𝐒𝔦𝓔 🇺🇲🇰🇷✝️🍿📽️🎬✨ (@SusieKxoxo) March 10, 2023

Japanese Girl Holi Molestation Video Viral First Reaction


Previous Post

हौसेला मोल नाही! चक्क बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा डान्स; चर्चा तर होणारच

Next Post

न्यायालय परिसरात होळी कार्यक्रमात अश्लील नृत्य; उच्च न्यायालयाने दिले हे आदेश

Next Post

न्यायालय परिसरात होळी कार्यक्रमात अश्लील नृत्य; उच्च न्यायालयाने दिले हे आदेश

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group