पुणे – सध्या सणासुदीचे दिवस असून नवरात्रोत्सव सुरू आहे. सहाजिकच अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केले आहे. फ्लिपकार्ट ॲमेझॉन वर देखील अशाच आयफोनच्या आकर्षक ऑफर्स आहेत. अॅपल आयफोन मॉडेल्सच्या आकर्षक ऑफर्स ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुरू आहेत.
फ्लिपकार्टच्या बिल बिलियन डेज मोहिमेत, अॅपल आयफोन12 या मॉडेलची किंमत, 40,999 पासून सुरू होत आहे. त्याचप्रमाणे, अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल अंतर्गत, आयफोन 11 ची किंमत 68,300 रुपये असून तो ऑफरमध्ये 38,999 रुपयांना उपलब्ध आहे.
आयफोन 12 मिनी मॉडेलची किंमत फ्लिपकार्टवर 40,999 रुपये आहे तर आयफोन 12 च्या 64 जीबी या मॉडेलची किंमत 52,999 रुपये आहे. तो काळा, निळा, हिरवा, जांभळा आणि पांढरा अशा रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट फोनच्या खरेदीवर 15,800 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू ऑफर करत आहे.
त्याचबरोबर, अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल अंतर्गत, iPhone 11, 64 GB 38,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1836 रुपयांची ईएमआय सुविधा मिळू शकते. यात काळा, लाल, हिरवा, जांभळा, पांढरा आणि पिवळा असे रंग पर्याय देखील आहेत.
128 जीबी आयफोन 11 ची किंमत 43,999 रुपये आहे आणि हा फोन आपण 31,599 मध्ये मिळवू शकता. कारण यावर 12,400 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळू शकते, आपल्याला फक्त तो पत्ता देणे आवश्यक आहे जिथे फोन वितरित केला जाऊ शकतो.