इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मागील दोन वर्षीच्या कोरोनाच्या संकटानंतर भारतीय शेअर बाजारासाठी यंदाचे वर्ष 2022 हे खूप यशस्वी मानले जाते. कारण यंदा मोठ्या संख्येने लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांनी मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये काही पेनी स्टॉकचा देखील समावेश असून पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे काहीसे धोक्याचे आहे, असे सांगितले जात असले तरी कंपनीचे तत्त्व आणि व्यवसाय मजबूत असेल तर हे स्टॉक चांगला परतावा देतात.
विशेष म्हणजे यंदा शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांनी भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्समध्ये त्यांचा हिस्सा 0.07 टक्क्यांनी वाढवला आहे. झुनझुनवाला यांचा टाटा मोटर्समध्ये 1.18 टक्के हिस्सा आहे. आता कंपनीचे सुमारे 3,92,50,000 शेअर्स आहेत. सप्टेंबर तिमाहीपर्यंत, झुनझुनवाला ऑटोमेकर कंपनीमध्ये सुमारे 1.11 टक्के किंवा 3,67,50,000 रूपयांचे शेअर्स होते.
राकेश झुनझुनवाला यावर्षी Akasa Air लाँच करून विमान वाहतूक उद्योगात प्रवेश करणार आहेत. तसेच झुनझुनवाला यांची या एअरलाइनमध्ये सर्वाधिक भागीदारी असेल. त्यांच्या कंपनीचा दावा आहे की, आकासा ही स्वस्त आणि बजेट मधील विमान कंपनी असल्याचे सिद्ध होईल. गेल्या एका वर्षात, समभागाने गुंतवणूकदारांना जवळपास 100 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत सुमारे 97.54 टक्के वाढ झाली आहे.
यापूर्वी टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की व्हेरिएंट आणि मॉडेलच्या आधारावर सरासरी 0.9 टक्के वाढ होईल. एकूण इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे टाटाला त्यांच्या वाहनांच्या किमतीत किरकोळ वाढ करावी लागली आहे. तथापि, वाढलेल्या किमतीचा दि. 18 जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या टाटा कारवर कोणताही परिणाम होणार नाही.