पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – एअरटेल, व्हीआय, जिओ यासारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्याकरिता सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) कडून प्री-पेड असा ‘वर्क फ्रॉम होम ‘ प्लॅनची ( घरातून काम ) ऑफर दिली जात आहे. हा प्री-पेड प्लॅन खास घरून कामाच्या गरजा लक्षात घेऊन सादर करण्यात आला आहे. बीएसएनएलचा चा वर्क फ्रॉम होम स्पेशल टेरिफ व्हाउचर (STV) प्लॅन 599 रुपयांना मिळेल. या प्लॅनमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच, राष्ट्रीय रोमिंग की सह दिल्ली आणि मुंबईच्या एमटीएनएल नेटवर्कवर मोफत व्हॉईस कॉलिंग करता येते.
599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 5 GB अमर्यादित डेटा दिला जातो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 80 Kbps पर्यंत घसरेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधा आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. बीएसएनएलचे 599 रुपयांचे स्पेशल टॅरिफ व्हाउचर बीएसएनएलचा वेबसाइटवर CTOPUP द्वारे किंवा सेल्फ-केअर ऍक्टिव्हेशनद्वारे केले जाऊ शकते.
बीएसएनएलचा कडून 251 रुपयांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम ‘ प्लॅन ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये 70 जीबी डेटा दिला जात आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा डेटा स्पेशल प्लॅन असून आपल्याला जर कॉलिंग आणि एसएमएस सुविधा हवी असेल तर तुम्हाला वेगळा रिचार्ज करावा लागेल. या सर्व योजना भारतातील सर्व सर्कलमध्ये रिचार्जसाठी उपलब्ध आहेत. कोणतेही ग्राहक हे बीएसएनएल पोर्टल, माय बीएसएनएल अॅप, किरकोळ विक्रेते आणि थर्ड पार्टी साइटवरून रिचार्ज करू शकतील.