India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कविता राऊत, दत्तू भोकनळ सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरकारी नोकरीबाबत सरकारने केली ही मोठी घोषणा

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाच नावलौकिक उंचावणाऱ्या आपल्या खेळाडूंना सरकार नोकरी मध्ये घेतलं जातं नाही. अत्यंत कष्टाने व जिद्दीने हे खेळाडू देशासाठी पदक मिळवतात, पण आपण त्यांचा योग्य तो सन्मान करू शकत नाही, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे फक्त समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे केली. त्यावरील उत्तरात कविता राऊत, दत्तू भोकनळ व अंजना ठमके या खेळाडूंना नवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करून वर्ग १ पदी तात्काळ नोकरीत सामावून घेतले जाईल अशी माहिती राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

यावेळी लक्षवेधी सूचना मांडताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकचे आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ व अंजना ठमके या खेळाडूंनी जगभरात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कारने सन्मान देखील केला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वत्कृष्ट भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार सुद्धा सन २०२० मध्ये दत्तू भोकनळ यांना प्राप्त झालेला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, राज्य शासनाने शासन निर्णय दि. ३० एप्रिल, २००५ नुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर दि. १ मे,२०११ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली तर शासन सेवेत थेट नियुक्तीची मानके देखील निश्चित केलेली आहेत. या शासन निर्णयातील वर्ग १ पदासाठी आवश्यक असलेले निकष या तीन्ही खेळाडूंनी पूर्ण केलेले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजविणारे बहुतांश खेळाडूंना नोकरीची प्रतीक्षा कायम आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक प्राप्त खेळाडूंना थेट ‘वर्ग ‘अ’ नियुक्ती देण्याचा शासन आदेश असूनही त्याकडे प्रशासकीय उदासीनता दिसून येत आहे. खेळासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावल्यानंतरही खेळाडूंची शासन दरबारी उपेक्षाच सुरू आहे. वयोमर्यादा संपल्यानंतर अर्थात म्हतारे झाल्यांनंतर शासकीय नोकरी मिळणार का ? असा टाहो पात्र खेळाडूंकडून केला जात आहे. वारंवार चांगली कामगिरी करूनही, तसेच राष्ट्रीय राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार प्राप्त करूनही असंख्य खेळाडू शासकीय नोकऱ्यांपासून वंचित आहेत. त्यामुळे फक्त समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे केली.

यावरील उत्तरात क्रीडा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, सन २०१८ पासून शासनाने नवीन क्रीडा धोरण आणले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून याबाबत अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे नवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करून पात्र असलेल्या कविता राऊत आणि दत्तू भोकनल यांना वर्ग १ पदी तात्काळ नोकरीत सामावून घेतले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

नाही, हे खेदजनक आहे. फक्त समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.#MaharashtraAssembly #Sportsperson pic.twitter.com/62TxcY0R1T

— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 3, 2023

International Players Government Service Assembly Announcement


Previous Post

सावधान! कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल; NTAने काढले हे आदेश

Next Post

चांदवडला शेतकऱ्यांचा संयम संपला… कांदा लिलाव बंद पाडले… सर्वपक्षीय नेते व शेतकरी एकवटले… उपोषण सुरू…

Next Post

चांदवडला शेतकऱ्यांचा संयम संपला... कांदा लिलाव बंद पाडले... सर्वपक्षीय नेते व शेतकरी एकवटले... उपोषण सुरू...

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group