इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद गेल्यावर्षी गपचूप विवाहबंधनात अडकला. उन्मुक्त चंद आणि सिमरन खोसला यांनी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच सात फेरे घेत लग्न केले. २१ नोव्हेंबर २०२१ ला त्यांचं लग्न झालं. अनेकवर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सिमरन ही प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे.
भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद विवाहबंधनात अडकला. सिमरन खोसलासोबत त्याने लग्नगाठ बांधली. सिमरन ही फिटनेस आणि न्यूट्रीशन कोच आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत उन्मुक्त चंद याने आपल्या चाहत्यांना लग्नाची माहिती दिली होती. उन्मुक्त चंद आणि सीमरन खोसला अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती होती.
उन्मुक्तनं भारताला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला होता. २०१२ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक संघाचा कर्णधार होता. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर उन्मुक्तने अमेरिकेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. उन्मुक्त सध्या अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये सिलिकॉन वॅली स्ट्राइकर्ससोबत खेळत आहे. काही दिवसांपूर्वीच उन्मुक्तने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतलाय. या लीगमध्ये उन्मुक्त मेलबर्न रेनेगेड्स या संघाकडून खेळणार आहे.
बिग बॅश लीगमध्ये खेळणारा उन्मुक्त पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलाय. अशा या गुणी खेळाडूच्या पत्नीबद्दल फार कमी चाहत्यांना माहिती आहे. सौंदर्य आणि फिटनेसमध्ये ती बड्या अभिनेत्रींच्या तोडीस तोड आहे. उन्मुक्त चंदचे मन जिंकणारी सिमरन व्यवसायाने फिटनेस आणि न्यूट्रीशन कोच आहे. सिमरन खोसला हिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरून त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.
https://twitter.com/cricketworldcup/status/1165872115788201985?s=20
Indian Cricketer Unmukt Chand Love Story and Wedding