India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम सध्या काय करतो? त्याची संपत्ती किती? अशी आहे त्याची सर्व कुंडली…

India Darpan by India Darpan
January 23, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन अगदी मरणासन्न अवस्थेत असल्याच्या ऐवढेच नव्हेतर त्याच्या मृत्यूच्या बातम्या अनेकदा आल्या. मात्र, त्यात काही तत्थ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दाऊदची अख्खी कुंडलीच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उघड केली आहे. तो कराचीत संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत वास्तव्यास असून शाही जीवन जगत आहे. तब्बल १२ लाख कोटींच्या अफाट संपत्तीचा तो मालक आहे. या अतिप्रचंड संपत्तीचे वारसही निश्चित केले गेले आहेत. ऐवढेच नाही तर दाऊद, त्याचा भाऊ आणि साथीदारांची पुढची पिढीसुद्धा याच धंद्यात सहभागी झाली आहे.

ड्रग्जचा धंदा, स्मग्लिंग, खंडणी, धमकावणे, हवाला रॅकेट, बॉलीवुड टॉलीवूडमधील बेकायदा गुंतवणूक, बेनामी संपत्ती अशा गैरमार्गाने दाऊदने जंगम मालमत्ता जमवली आहे. दाऊदसोबतच त्याच्या भावंडांची मुले, छोटा शकीलचा मुलगा, इकबाल कासकरचा मुलगा अशी या गुंडांची पुढची पिढी देखील ‘गंदा है पर धंदा हे’ म्हणत याच व्यवसायात स्थिरावली आहे.

अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक
बेकायदेशीर मार्गाने गोळा केलेली संपत्ती डी कंपनीने कंटेनर कंपन्या, शिपिंग कंपन्या, आयात-निर्यात, खाण, विमान उद्योग, ऊर्जा, मिनरल कंपन्या, पब्लिकेशन हाऊस, रियल इस्टेट, कंत्राटी शेती, हिरे व्यापार, सोन्याचा पुरवठादार आदी क्षेत्रात गुंतवण्यात आली आहे. यातील अनेक धंदे कायदेशीर असतील आणि त्यातून मिळणारा पैसाही बेकायदा नसावा, यावर भर दिला जात आहे.

व्यावसायिक विभागणी
– दाऊदसोबत कराचीत असलेला त्याचा मुलगा मोईन अगळपगळ संपत्तीचा वारस आहे.
– दाऊदचा मुलगा मोईन, त्याचा मरण पावलेला भाऊ तुराचा मुलगा सर्फराज हे ऊर्जा, मिनरल आणि सोन्याचा धंदा सांभाळतात.
-छोटा शकीलचा मुलगा आणि भारतात वास्तव्यास असलेल्या दाऊदच्या बहिणीचा मुलगा दुबईत रिअल इस्टेटमधील कोट्यवधींची गुंतवणूक सांभाळतात.
– नुराचा दुसरा मुलगा सोहेल छोट्या शस्त्रास्त्रांचा बेकायदा धंदा करतो.
– इकबाल कासकर ठाण्याच्या तुरुंगात असून मुलगा अब्यान कायदेशीर आयात- निर्यातीचा धंदा सांभाळतो.
– दाऊदचा भाऊ मुस्तकीन याची मुलगी दुबईत एक लॉ फर्म चालवत असून हिऱ्यांचा व्यापार सांभाळते.

Underworld Don Dawood Ibrahim Property and Details


Previous Post

या भारतीय खेळाडूची पत्नी आहे फिटनेस ट्रेनर, गुपचूप केले त्याने लग्न

Next Post

‘भारत जोडो यात्रा’ संपताच राहुल गांधी काय करणार? परदेशात आरामाला जाणार? की…?

Next Post

‘भारत जोडो यात्रा’ संपताच राहुल गांधी काय करणार? परदेशात आरामाला जाणार? की...?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group