India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बराच काळ उधारीवरच जगत होते अभिनेता गोविंद नामदेव

India Darpan by India Darpan
January 23, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘सौदागर’, ‘आँखे’, ‘सरफरोश’, ‘सत्‍या’, ‘वॉन्टेड’, ‘भूलभुलैया २’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता गोविंद नामदेव यांनी उत्तम काम केलं. बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या गोविंद नामदेव यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ‘शोला और शबनम’ चित्रपटामुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. ही लोकप्रियता मिळवण्यापूर्वी या सुप्रसिद्ध अभिनेत्याला त्याच्या करिअरमध्ये संघर्ष करावा लागला आहे. एका मुलाखतीमध्ये गोविंद यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

गोविंद नामदेव म्हणाले, “‘शोला और शबनम’ हा माझा पहिला चित्रपट. यामध्ये मी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना आवडली. यानंतर मला बऱ्याच चित्रपटासाठी विचारण्यात आलं पण मी त्याला नकार दिला. वास्तविक याला कारण ठरला तो मला आलेला एक अनुभव, असं गोविंद सांगतात.

‘शोला और शबनम’च्या चित्रीकरणादरम्यान मी अभिनेते महावीर सिंह यांच्याबरोबर बसलो होतो. त्यांनी मला सांगितलं की, पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमधील हा माझा ३२वा चित्रपट आहे. मला इतर कोणत्या भूमिका मिळतच नाहीत. त्यांची ही गोष्ट ऐकून मीही प्रभावित झालो. या सगळ्यामध्ये मीही भरडला जाऊ नये म्हणून एक निर्णय घेतला. मला अनेक चित्रपटांसाठी विचारणा झाली त्यास मी नकार देत गेलो.”

पुढे ते म्हणाले, “मी जेव्हा २-३ चित्रपटांसाठी नकार दिला तेव्हा माझ्याबाबत अनेक अफवा पसरवल्या गेल्या. मी घमेंडी असल्याची चर्चा झाली. त्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. चित्रपटामध्ये काम मागण्यासाठी मी सेटवर फिरायचो. घर चालवण्यासाठी मी वर्कशॉप घेण्यास सुरुवात केली. इतर बरीच काम केली. आज याच्याकडून तर उद्या दुसऱ्याच व्यक्तीकडून उधारीवर पैसे घेत दिवस काढले.” आज मात्र परिस्थिती बदलली असून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये गोविंद नामदेव यांचा समावेश होतो.

Bollywood Actor Govind Namdev Life journey Struggle


Previous Post

अशी झाली होती अभिषेक-ऐश्वर्याची पहिली भेट; अभिषेकनेच सांगितला तो किस्सा…

Next Post

या भारतीय खेळाडूची पत्नी आहे फिटनेस ट्रेनर, गुपचूप केले त्याने लग्न

Next Post

या भारतीय खेळाडूची पत्नी आहे फिटनेस ट्रेनर, गुपचूप केले त्याने लग्न

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group