इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंढरपूरः मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. भालके यांनी पवार यांची भेट घेतल्याने पंढरपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भालके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असतील, तर पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात झालेल्या गेल्यावेळच्या पोटनिवडणुकीत एक लाख पाच हजार मते घेऊन अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेले भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला.
केसीआर यांचा तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने भालके यांनी आज शरद पवार यांची गोविंद बागेत भेट घेतली. त्यामुळे भालके पुन्हा घरवापासी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आज शरद पवार यांची नाशिकसह विविध ठिकाणच्या नेत्यांनी भेट घेतली. तर काहींना पक्ष प्रवेश केला.