इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडः बीडमधील ‘हिट अँड रन’ च्या घटनेत एका पोलिस उपनिरीक्षकालाच बळी गेला आहे. परीक्षेच्या बंदोबस्तसाठी ते जात असताना भरधाव वेगाने येणा-या कारची धडक बसून त्यात मच्छिंद्र नन्नवरे या पोलिस निरीक्षकाचा बळी गेला आहे.
बीडमधील नेकनूर जवळ हा अपघात झाला आहे. नन्नवरे वस्तीतून पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी नन्नवरे जात असताना नेकनूर- मांजरसुंबा रस्त्यावर नेनूर पासून जवळच कालिका मंगल कार्यालयासमोर नेकनूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. समोरून येणाऱ्या कारची धडक बसल्याने नन्नवरे खाली पडले. त्यानंतर कारही रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.
दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात हा अपघात कसा झाला, हे दिसत आहे. आज सकाळी हा अपघात झाला. अपघात होताच कारचालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. कालिका मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.