नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळालीकॅम्प रोडवरील दत्त पेट्रोल पंप जवळ रस्ता ओलंडत असतांना झालेल्या दुचाकी अपघातात २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम गौतम खडताळे (रा.प्रभाकर हौ.सोसा.नाणेगावरोड दे.कॅम्प) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. खडताळे गेल्या १३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास देवळाली कॅम्परोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.
दत्त पेट्रोल पंपासमोरील दुभाजक परिसरातून तो रस्ता ओलांडत असतांना दोन दुचाकींमध्ये धडक झाली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. याबाबत अंमलदार दत्तात्रेय खैरे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.