इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॅा. बी.जी. शेखर शनिवारी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. कराळे यांची खरं तर जानेवारी महिन्यात या पदावर बदली झाली होती. पण,मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॅा. बी.जी. शेखर यांनी पुन्हा पदभार स्विकारला होता. आता डॅा. शेखर सेनानिवृत्त झाल्यानतंर पुन्हा कराळे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.