इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः उच्च न्यायालयाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने केलेल्या बदलाला स्थगिती दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया उद्या (ता. १७) पासून सुरू होणार आहे. त्यामुळे पालकांना उद्यापासून आरटीईसाठी अर्ज करता येणार आहे. पूर्वी अर्ज भरलेल्या पालकांनाही नव्याने अर्ज भरावा लागणार आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत एक लाखांहून जागा उपलब्ध असून, आरटीई २४ टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. पाल्यांची यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे.
आरटीई प्रवेशाच्या पोर्टलवर आरटीई प्रवेशास पात्र शाळा व उपलब्ध जागांची जिल्हानिहाय माहिती देण्यात आली आहे. राज्य शासनाने काढलेल्या नऊ फेब्रुवारीच्या नवीन आदेशानुसार, शालेय शिक्षण विभागाने यंदा बदल केला होता. त्यामुळे खासगी शाळेत प्रवेशाला विद्यार्थी मुकणार होते. या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.