नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सटाणा तालुक्यातील अंबासन परिसरात शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत अंदाजे ४० ते ४५ क्विंटल कांदा चोरुन नेल्याची घटना घडली आहे. मालेगाव-नामपूर रस्त्यावर देवीदास कोर या शेतक-याने पाच एकर शेतात कांदा लागवड केली होती. त्यासाठी त्याला जवळपास १ लाख ३५ हजाराचा खर्च झाला होता.
हा कांदा काढून शेतात शिरोळ्या करुन ठेवलेल्या होत्या. कांदा विक्रीसाठी कोर यानी काही कांदा ट्रॉली मध्ये भरुन ठेवला होता. पावसाचे वातावरण असल्याने ते कांदा झाकण्यासाठी पुन्हा शेतात आले असता कांदा चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी जायखेडा पोलिसात कांदा चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.