इंडिया दर्णण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत मेगा रोड शो सुरु झाला आहे. मुंबईतील घाटकोपर अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीजपर्यंत मोदींच्या रोड शोचं भव्य आयोजन करण्यात आले आहे. मुंबईमधील पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच मेगा रोड शो असून त्यासाठी मोठी गर्दी जमली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरी व कल्याण येथे सभा झाल्यानंतर हा रोड शो होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा अगोदरही झाल्या आहे. पण, रोड शो हा पहिल्यांदा होत आहे.