.
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज ठाकरे म्हणजे फुस्स झालेला लवंगी फटाका आहे, त्याचा कोकणमध्ये काही फरक पडणार नाही अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी टीका केल्यानंतर त्याला मनसेचे अमय खोपकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रत्नागिरी – सिंधुर्दुर्ग लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री नारायण राणे व विनायक राऊत यांचा सामना रंगणार आहे. त्यामुळे राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे एकत्रीत सभा घेणार असल्याच्या प्रश्नावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
त्यानंतर अमेय खोपरकर यांनी राजसाहेब ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. जनतेच्या कल्याणाचं कोणतंही काम न करणारे खासदार राऊत असोत किंवा रडत राऊत असोत, तुम्ही आमच्या साहेबांवर खालच्या पातळीची टीका करणार असाल तर आम्ही मनसैनिक ते खपवून घेणार नाही. तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही आम्हाला गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढं लक्षात असू दे. ही धमकी समजा नाहीतर खुलं आव्हान… आता होऊनच जाऊ दे
.