नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परिचीताने विवाहीतेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुटूंबियास मारून टाकेल अशी धमकी देत गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे वैतागलेल्या पिडीतेने पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोद सुभाष बुध्दीसागर (४०) असे संशयिताचे नाव आहे. नांदूरनाका भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडिता व संशयित एकाच भागातील रहिवासी असून ते एकमेकांचे परिचीत आहेत. कौटुंबिक संबधातून त्यांच्यात मैत्री झाली होती. १ ऑगष्ट २०२२ रोजी महिला घरात एकटी असल्याची संधी साधत त्याने बळजबरीने बलात्कार केला.
तसेच या घटनेची वाच्यता केल्यास कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याने बलात्कार व अनैसर्गिक कृत्य केले. गेल्या दीड वर्षापासून हा प्रकार सुरू असून संशयिताचा अतिरेक वाढल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.
……