इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जगभरातील प्रसिध्द नेते लहानपणा कसे दिसत असेल याचा एक व्हिडिओच सध्या चर्चेत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हा व्हिडिओ तयार करण्यात आला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मिडियावरील हा व्हिडीओ Al च्या माध्यमातून बनवण्यात आल्यानंतर तो चांगलाच पसंतीस पडला आहे.
या व्हिडीओमध्ये जगातील बडे नेते लहान असताना कसे दिसत असतील या संबंधिचा आहे. व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ, रशियाचे अध्यक्ष प्लादिमीर पुतिनसह अनेक प्रमुख नेते आहेत. व्हिडीओमध्ये उत्तर कोरियाचे नेते जोंग उन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो आणि यांचा सुध्दा लहानपणाचा एआय फोटो आहे.