नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिरपूर येथील उपविभागीय अधिकारीचा शासकीय वाहन चालक मुकेश विसपुते याने सहीचा लेखी आदेश मिळवून देण्याचे मोबदल्यात २० हजाराची लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणात एक खासगी इसम बॉबी उर्फ प्रशांत लोटन सनेर याच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिेलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा ट्रॅक्टर व त्यासोबत असलेली ट्रॉली वाळू या गौणखनिजाची वाहतूक करताना गौणखनिज पथक, शिरपूर यांना मिळून आला होता. सदरील ट्रॅक्टर व त्यासोबत असलेली ट्रॉली तक्रारदार यांचे ताब्यात देणेकामी उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, धुळे यांचे सहीचा लेखी आदेश देण्याचे मोबदल्यात उपविभागीय अधिकारी, यांचेशी असलेल्या वैयक्तिक संबंधाचा प्रभाव तक्रारदार यांच्यावर टाकून त्यांच्याशी संबंधित असलेला खाजगी इसम नामे बॉबी उर्फ प्रशांत लोटन सनेर याने शासकीय वाहन चालक मुकेश विसपुते यांना तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्विकारणे करिता अपप्रेरणा देऊन, मुकेश विसपुते यांचे मार्फत लाच मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच शासकीय वाहन चालक मुकेश विसपुते यांनी उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, धुळे यांचे सहीचा लेखी आदेश मिळवून देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे 20,000/- रुपये लाचेची मागणी करून मागणी केलेली लाचेची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आलोसे क्रमांक 01 व खाजगी इसम क्रमांक 02 यांचेविरुद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशन, धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 अ, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*लाचेची मागणी सापळा कारवाई
*युनिट -* ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार- पुरुष, 33 वर्ष, शिरपूर, जिल्हा- धुळे
आलोसे – 1) मुकेश अरविंद विसपुते, वय – 35 वर्ष, धंदा – नोकरी, शासकीय वाहन चालक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिरपूर भाग, जिल्हा- धुळे राहणार – 7 बि, विमल नगर, शिंगावे शिवार, शिरपूर जि. धुळे
खाजगी इसम – 2) बॉबी उर्फ प्रशांत लोटन सनेर, वय – 50 वर्ष, धंदा – प्लॉट खरेदी विक्री, राहणार – प्लॉट नंबर 39, शाहू नगर, धुळे देवपूर, जि. धुळे
*लाचेची मागणी- दिनांक 26/12/2023 रोजी 20,000/-रुपये .
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचा ट्रॅक्टर व त्यासोबत असलेली ट्रॉली वाळू या गौणखनिजाची वाहतूक करताना गौणखनिज पथक, शिरपूर
यांना मिळून आला होता. सदरील ट्रॅक्टर व त्यासोबत असलेली ट्रॉली तक्रारदार यांचे ताब्यात देणेकामी उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, धुळे यांचे सहीचा लेखी आदेश देण्याचे मोबदल्यात उपविभागीय अधिकारी, यांचेशी असलेल्या वैयक्तिक संबंधाचा प्रभाव तक्रारदार यांच्यावर टाकून त्यांच्याशी संबंधित असलेला खाजगी इसम नामे बॉबी उर्फ प्रशांत लोटन सनेर याने शासकीय वाहन चालक श्री. मुकेश विसपुते यांना तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्विकारणे करिता अपप्रेरणा देऊन, श्री. मुकेश विसपुते यांचे मार्फत लाच मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच शासकीय वाहन चालक श्री. मुकेश विसपुते यांनी उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, धुळे यांचे सहीचा लेखी आदेश मिळवून देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे 20,000/- रुपये लाचेची मागणी करून मागणी केलेली लाचेची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आलोसे क्रमांक 01 व खाजगी इसम क्रमांक 02 यांचेविरुद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशन, धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 अ, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*आलोसे यांचे सक्षम अधिकारी – मा. जिल्हाधिकारी, धुळे
*सापळा अधिकारी – श्री संदीप बबन घुगे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक*
सापळा पथक– पोलीस नाईक/ गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई / नितीन नेटारे, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .