नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल गाडीमध्ये एक साम्य आहे. आपल्याला आवडलेलं मॉडेल आपली खरेदी करायची क्षमता होईपर्यंत बंद झालेलं असतं. मोबाईलच्या बाबतीत तर नेमकं असच आहे. एकतर आपला आवडता मोबाईल खरेदी करेपर्यंत त्यात अपडेट मॉडेल आलं असतं. आणि कारच्या बाबतीत असं होतं की नेमकं आपल्याला आवडलेलं मॉडेल खरेदी करेपर्यंत बंद झालेलं असतं. एका जगविख्यात अॉटोमोबाईल कंपनीनं त्यांच्या लोकप्रिय कारचे ११ व्हेरियंट बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसलेला आहे.
ह्युंदाई ही दक्षिण कोरियाची अॉटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीने विविध कारचे अनेक मॉडेल बाजारात आणले आणि ते लोकप्रिय झाले. त्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. भारतात तर मारुती आणि होंडाच्या तुलनेत ह्युंदाईने लोकप्रियता मिळवली. ह्युंदाईच्या क्रेटा, आय-२० आणि व्हर्ना या सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या आणि ग्राहकांनी खरेदी केलेल्या कार आहेत. पण आता या तिन्ही कारचे ११ व्हेरियंट बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. तसेच व्हेरियंटमध्ये मोठे बदलही केले आहेत. यावर्षीपासून रिअल ड्रायव्हिंग एमिशन नॉर्म्स लागू होत आहेत. त्यामुळे डिझेल कारची विक्री कंपन्यांनाच परवडणारी नसेल. त्याचा परिणाम असा झाला की कंपनीने डिझेल कारची निर्मिती बंद करायला हळूहळू सुरुवात केली आहे.
हे व्हेरियंट केले बंद
व्हर्ना, क्रेटा आणि आय-२० या तीन कारचे ११ व्हेरियंट बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ह्युंदाई क्रेटाचे 1.4 Turbo GDI DCT S+ आणि 1.5 iMT S बंद होणार आहेत. या सर्व कार जानेवारी म्हणजे याच महिन्यात बंद होतील. आय-२० चे ASTA (O) 1.5 CRDi MT, MAGNA 1.5 CRDi MT आणि SPORTZ 1.5 CRDi MT हे व्हेरियंट २३ जानेवारीपासून बंद होत आहेत. ह्युंदाई व्हर्नाचे 1.0 TURBO GDI DCT SX(O) हे व्हेरियंट २३ जानेवारीपासून तर डिझेलचे दोन आणि पेट्रोलचे दोन व्हेरियंट फेब्रुवारीपासून बंद होतील.
Hyundai India Stop Production of 11 Car Models
Verna Creta i20 Automobile