India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात सापडले पोतभर खोटे दागिने

India Darpan by India Darpan
January 11, 2023
in राज्य
0

 

पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोते भरून खोटे दागिने सापडल्याचे मंदिरातील अधिकार्‍यांनी जाहीर केले आहे. यामागे काही भाविक मुद्दामहून असे खोटे दागिने टाकत असल्याचे कारण देण्यात आले आहे. यातून एकप्रकारे मंदिर प्रशासनाने स्वत:चे हात झटकले आहेत. या प्रकरणी मंदिरातीलच कोणीतरी खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवून दागिन्यांचा अपहार केलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची शासनाने एका उच्चपदस्थ अधिकार्‍यांकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भातील एक निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी निवेदन स्वीकारले आणि ‘योग्य त्या कार्यवाहीसाठी हे निवेदन पुढे पाठवले जाईल’, असे आश्वासन सोलापूरचे हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुनगे यांना दिले.

पत्रात म्हटले आहे की, यापूर्वीही मंदिर प्रशासनाच्या कारभारात ‘दानपेटीत जमा होणारे पैसे रोजच्या रोज बँकेत जमा न करता दोन-दोन महिने पोत्यात भरून ठेवणे’, ‘हिशेबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी न ठेवणे’, ‘प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी करणे; मात्र दुग्धोत्पादनातून मिळणारे उत्पन्न न दाखवणे’, ‘मंदिरातील गोधन कसायांना विकणे’, ‘48 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखापरीक्षकांकडून तपासून न घेणे’, ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत भाडे करारावर घेणे; मात्र या इमारतीचा अपेक्षित असा वापर न झाल्याने वर्ष 2000 ते 2010 या कालावधीत मंदिराला 47 लाख 97 हजार 716 रुपयांचा तोटा होणे आदी अनेक प्रकारचे घोटाळे हिंदु जनजागृती समितीने उघड केले आहेत. त्यामुळे पोतते भरून खोटे दागिने सापडणे या प्रकरणातही काळेबेरे असू शकते, असा संशय पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, जे वारकरी अन् वैष्णवजन शेकडो कि.मी. पायी वारी करतात. ऊन, पाणी, थंडी आदींची पर्वा न करता आपल्या लाडक्या विठूरायाला भेटायला येतात. ते विठूरायाला खोटे दागिणे अर्पण का करतील ? हा तर एकप्रकारे भोळ्या-भाबड्या वारकर्‍यांवर आरोप केल्यासारखेच आहे. या प्रकरणी नेमके काय षड्यंत्र आहे, याचा शोध घेतला गेला पाहिजे. यामध्ये भाविक सराफाकडून देवासाठी दागिने तयार करून घेतात. तेव्हा सराफाकडून खोटे दागिने दिले जात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचाही सरकारने शोध घ्यायला हवा. असे पुन्हा कोणाला करता येऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने दागिने अर्पण करताना ते खरे आहेत कि खोटे आहेत, हे लगेच पडताळण्याची व्यवस्था करायला हवी. अशी व्यवस्था करणे, मंदिर प्रशासनासाठी सहज आहे; मात्र अशी व्यवस्था अद्यापपर्यंत का निर्माण करण्यात आली नाही, यातून मंदिर प्रशासनाला देवनिधीची किती काळजी आहे, हेच दर्शवते. हे सर्व मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. मंदिर व्यवस्थापन भक्तांकडे असेल, तर भक्त देवनिधी कधी लुटणार नाहीत. यासाठी मंदिर सरकारीकरण रहित करावे, अशीही मागणी समितीने केली आहे.

Fake Gold Ornaments Found in Pandharpur Temple
Shree Vithhal Rukmimi


Previous Post

मंत्रालयातील सर्व शासकीय पत्रांवर आता राहणार हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य

Next Post

ह्युंदाई कंपनीचा मोठा निर्णय! कार मॉडेल्सचे तब्बल ११ व्हेरिएंट होणार बंद

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

ह्युंदाई कंपनीचा मोठा निर्णय! कार मॉडेल्सचे तब्बल ११ व्हेरिएंट होणार बंद

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group