India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मोबाईल ग्राहकांनो तयार रहा! प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही महागणार

India Darpan by India Darpan
January 11, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टेलिकॉम कंपन्या दर एक-दोन वर्षांत प्रीपेड रिचार्ज आणि मोबाईल बिलाच्या रकमेत वाढ करून ग्राहकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. या कंपन्या लाख ऑफर्स देतील, पण कुठल्या ना कुठल्या मार्गातून सर्वसामान्य माणसाच्या खिशाला नक्कीच कात्री लावतील. आता पुन्हा एकदा रिचार्ज बिलाच्या रकमेत वाढ होणार असल्याचे टेलिकॉम कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

टेलिकॉम कंपन्यांनी २०२१ मध्ये मोबाईल रिचार्ज आणि पोस्टपेड बिलाच्या रकमेत वाढ केली होती. आयडिया व व्होडाफोनने ४२ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर सर्वच कंपन्यांनी वाढ करायला सुरुवात केली होती. यावर्षी सुद्धा अश्याचप्रकारची वाढ होणार असल्याचं कंपन्यांनी सांगितलं आहे. यावर्षी एप्रिलच्या आसपास ही वाढ होण्याची शक्यता आहे. 5G संबंधित ARPU (एव्हरेज रेव्हेन्यू पर युझर) टेरिफ नगण्य होण्याची शक्यता असल्याने 4G च्या किंमती वाढविण्यात येणार असल्याचे टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे आहे. हे केवळ प्रिपेडसाठी नसून पोस्टपेड युझर्सलाही लागू असणार आहे. दोघांनाही नेहमीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागेल, असे चित्र आहे. मुख्य म्हणजे सध्या मोबाईल कंपन्या एक महिन्याच्या नावावर २४ किंवा २८ दिवसांचेच रिचार्ज देतात. त्यामुळे वाढीव किंमतीत पूर्ण एक महिनाही रिचार्जचा लाभ मिळत नसल्याने ग्राहकांचा तसाही तोटाच होत आहे. आता आणखी किंमती वाढवून ग्राहकांचे हाल करण्याची तयारी टेलिकॉम कंपन्यांनी केली आहे.

4G वर 5G चा लाभ
5G प्लान्स महागणार नसल्याचे एअरटेल आणि जीओ या टेलिकॉम कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. युझर्स त्यांच्या जुन्यात रिचार्जवर 5G सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. 5G सेवा प्रिमीयम केली जाणार नाही. पण ही सेवा सुरू करण्यासाठी सुरुवातीला एक रक्कम भरणे आवश्यक असेल, असेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

Mobile Prepaid and Postpaid Will Be Costly Soon
Telecom Company BSNL Reliance JIO Vodafone Airtel


Previous Post

ह्युंदाई कंपनीचा मोठा निर्णय! कार मॉडेल्सचे तब्बल ११ व्हेरिएंट होणार बंद

Next Post

जनरल आणि स्लिपर कोचबाबत रेल्वेने घेतला हा मोठा निर्णय; दररोज लाखो प्रवाशांना दिलासा

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

जनरल आणि स्लिपर कोचबाबत रेल्वेने घेतला हा मोठा निर्णय; दररोज लाखो प्रवाशांना दिलासा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group