India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

न्यूड सीनवरुन तब्बल ५० वर्षानंतर चित्रपट निर्मात्यांविरुद्ध तक्रार; कलाकारांना मिळणार ४१ अब्ज रुपये?

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात कधी काय होईल याचा नेम नाही. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार एका चित्रपटातील सीनबाबत तब्बल ५० वर्षानंतर दावा दाखल करण्यात आला आहे. १९६८ मध्ये आलेला हॉलिवूडचा हिट सिनेमा ‘रोमिओ आणि ज्यूलिएट’. या चित्रपटातील मुख्य अभिनेता आणि अभिनेत्रीने प्रसिद्ध कंपनी पॅरामाऊंट पिक्चर्सवर ५०० मिलियन डॉलर म्हणजे साधारण ४१ अब्ज ४० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. या चित्रपटात त्यांच्यावर शूट केलेल्या न्यूड सीनबाबत ही केस करण्यात आली आहे. आमची फसवणूक करत हे शूट करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी ते तरूण होते. सिनेमाची नायिका ओलिविया हसी तेव्हा १५ वर्षाची आणि हिरो लियोनार्डो व्हाइटनिंग १६ वर्षांचा होता.

या दोन्ही कलाकारांनी लॉस एंजलिस काउंटीच्या सुपीरिअर कोर्टात निर्मात्याविरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीची तक्रार केली आहे. याचिकेत म्हटल्याप्रमाणे सिनेमाचे दिग्दर्शक फ्रेंको जॅफीरेलीने कलाकारांना सांगितलं होतं की, बेडरूम सीनमध्ये दोघेही स्कीन-कलरचे अंडरगारमेंट्स घालतील. पण तसं झालं नाही. शूटींगच्या दिवशी सकाळी व्हाइटनिंग आणि हसी या दोघांनाही वेगळीच सूचना मिळाली. नवीन सूचनेनुसार, अंगावर एकही कपडा राहणार नाही. फक्त न्यूड मेकअप असेल, असे त्यांना दिग्दर्शकाने सांगितले, असे या दोघांचे म्हणणे आहे. याशिवाय न्यूड सीन असला तरी, कॅमेऱ्याचा अँगल अशाप्रकारे सेट असेल, जेणेकरून सीन शूट करताना पडद्यावर काहीच आक्षेपार्ह दिसणार नाही, अशी खात्री दिग्दर्शकाने दिली होती. मात्र आता याचिकेत सांगण्यात आलं आहे की, सीन पूर्णपणे न्यूडिटी फ्री शूट झाला नाही.

दरम्यान, दिग्दर्शक फ्रेंको जॅफीरेलीचं २०१९ मध्ये निधन झालं आहे. याचिकेत कलाकारांनी आरोप केला की, दिग्दर्शकाने त्यांना घाबरवलं होतं की, जर सिनेमा चालला नाही तर त्यांचं करिअर संपेल. त्यामुळे त्यांना न्यूड होऊन शूट करावं लागेल. ओलीविया हसी आणि लियोनार्डो व्हाइटनिंग यांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी त्या स्थितीत दिग्दर्शकाचं म्हणणं ऐकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. या सीनमुळे अनेक वर्ष त्यांना मानसिक आणि भावनात्मक त्रासाचा सामना करावा लागला. सिनेमा हिट ठरला आणि हायस्कूलमध्ये शेक्सपिअर शिकत असलेल्या तरूणांना हा सिनेमा दाखवला जाऊ लागला. पण रोमिओ आणि ज्यूलिएटच्या यशाचा कलाकारांच्या करिअरवर काहीच प्रभाव पडला नाही. आता लवकरच या केसवर सुनावणी होईल. असे सांगण्यात येत आहे.

Hollywood Movie Actors Court after 50 Years


Previous Post

मुंबईत सुरू झाली डिजीटल अंगणवाडी; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

Next Post

लग्नानंतरही मुलीचा संपत्तीवर अधिकार असतो का? उच्च न्यायालय म्हणाले…

Next Post
प्रातिनिधीक फोटो

लग्नानंतरही मुलीचा संपत्तीवर अधिकार असतो का? उच्च न्यायालय म्हणाले...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group