India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लग्नानंतरही मुलीचा संपत्तीवर अधिकार असतो का? उच्च न्यायालय म्हणाले…

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्न झालं म्हणजे आपला एक भागिदार कमी झाला, अशी मानसिकता असलेली भावंड आजही समाजात आहेत. एवढच नाही तर लग्न झालेल्या मुलीला परकं समजणारे पालकही आज समाजात मोठ्या प्रमाणात आहेत. पण लग्न झाल्यानंतर मुलगी परकी होते आणि तिचा संपत्तीवर अधिकार राहात नाही, ही मानसिकता चुकीची असल्याचा निर्वाळा गुजरात उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला.

गुजरात उच्च न्यायालयात यासदंर्भातील एका प्रकरणावर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायमूर्तींनी मुलीला परकं धन समजणाऱ्या कुटुंबाला चपराक लगावली आहे. मुलगी आणि बहीण यांच्याबद्दलची समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. कौटुंबिक मालमत्तेच्या वाटपासंदर्भातील ही याचिका होती. न्या. अरविंद कुमार व न्या. ए. शास्त्री यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. जिल्हा व सत्र न्यायालयातील निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

याचिकाकर्त्याने बहिणीचा संपत्तीवरील अधिकार संपला आहे की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने मुलीचं लग्न झालं म्हणून तिची कुटुंबातील जागा बदलत नाही, जिथे तिचा जन्म झाला तिच तिची जागा असते, असे स्पष्ट केले आहे. आता मुलीचा संपत्तीवर काही अधिकार नाही, ही मानसिकता चुकीची असल्याचे याचिकाकर्त्याला म्हटले आहे.

कायदा बदलला आहे
पूर्वी वडिलोपार्जित संपत्तीमध्ये घरातील पुरुषांचेच वाटे होते. यामध्ये बहिणी किंवा घरातील कोणतीही स्त्री वाटेकरी राहात नव्हती. मात्र, हिंदू उत्तराधिकारी कायद्यात २००५ मध्ये बदल करून मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत वाटा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हिंदू कायद्यानुसार दोन प्रकारच्या मालमत्ता आहेत. एक वडिलोपार्जित आणि दुसरी स्व-अधिग्रहित मालमत्ता. वडिलोपार्जित संपत्ती चार पिढ्यांपर्यंत वैध असते.

मुलामुळे फरक पडत नाही
कुटुंबातील मुलाचं लग्न झालं असेल किंवा नसेल, त्याची परिस्थिती चांगली असेल किंवा वाईट असेल… त्यामुळे लग्न झालेल्या मुलीच्या परिस्थितीत बदल होत नाही. तिची जागा पहिलेपासून शेवटपर्यंत कुटुंबात सारखीच असते, असंही न्यायालय म्हणालं.

High Court on Married Daughter Property Rights


Previous Post

न्यूड सीनवरुन तब्बल ५० वर्षानंतर चित्रपट निर्मात्यांविरुद्ध तक्रार; कलाकारांना मिळणार ४१ अब्ज रुपये?

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group