India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुंबईत सुरू झाली डिजीटल अंगणवाडी; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डिजिटल बालवाडीच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना कलाभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदतच होणार आहे. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. या माध्यमातून अंगणवाड्यामध्येही दर्जेदार सुविधा मिळतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मुंबई येथील कवडे मठ महापालिका शाळा, बाणगंगा, वाळकेश्वर येथे आज डिजिटल बालवाडीच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी भव्यता फाऊंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष कुलीन मणियार, रोमा सिंघानिया, नीला पारीख, गोरक्षनाथ गंभीरे, रीना जोगानी आदी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे. ज्या अंतर्गत कॉर्पोरेट संस्था, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. व व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी अनेक योजना शासन राबवत आहे. लोकसहभागातून सामाजिक संस्था या क्षेत्रात काम करू शकतात. भव्यता फाऊंडेशनने अंगणवाड्या दत्तक घेवून या अंगणवाड्यातील बालके व मातांना सक्षम करण्यासाठी मदतच केली आहे, असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.

आदिवासी जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्येही काम करणार : कुलीन मणियार
भव्यता फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष कुलीन मणियार म्हणाले, 2018 पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नियुक्त केलेल्या 37 बालवाड्या भव्यता फाउंडेशन चालवत आहे. याशिवाय, महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करून मुंबईतील आणखी पाच अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. अंगणवाड्या दत्तक घेण्‍यासाठी राज्‍य शासन आणि महिला व बालकल्‍याण विभाग यांनी खूप सहकार्य केले आहे. कॉर्पोरेट्स आणि उल्लेखनीय सामाजिक संस्थांसोबत भागीदारी करून, विस्तार योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यांतील आणखी 100 अंगणवाड्यांमध्ये ही सामग्री आणि रचना पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. भारतातील बोलीभाषांची विविधता लक्षात घेऊन आणि मातृभाषेतून शिकवण्याची गरज लक्षात घेऊन डिजिटल अंगणवाड्या हे शहर-आधारित प्ले स्कूल आणि आरंभ एलएमएसच्या बरोबरीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. यावेळी भव्यता फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले.

Digital Anganwadi Started in Mumbai


Previous Post

नवीन स्टार्टअप सुरू करणाऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

Next Post

न्यूड सीनवरुन तब्बल ५० वर्षानंतर चित्रपट निर्मात्यांविरुद्ध तक्रार; कलाकारांना मिळणार ४१ अब्ज रुपये?

Next Post

न्यूड सीनवरुन तब्बल ५० वर्षानंतर चित्रपट निर्मात्यांविरुद्ध तक्रार; कलाकारांना मिळणार ४१ अब्ज रुपये?

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group