नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका तरुणीने आपल्या वडिलांकडे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पाच लाख रुपयांची वारंवार मागणी केली, शेतजमिनीतही वाटा मागितला, या कारणावरून मानसिक दबावाखाली येऊन नैराश्यातून तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. तसेच सुसाईड नोटमध्ये याचा उल्लेखही केला. त्यामुळे या तरुणीला शिक्षा करण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी केली. मात्र, वडिलांकडे वारंवार पैशाची मागणी करणे म्हणजे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हणता येणार नाही, त्याची अन्यही कारणे असू शकतात, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तरुणीला दिला आहे.
मानसिक ताणतणावातून आत्महत्या करण्याचे प्रकार आणि प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले असून या संदर्भात तत्कालीन कारणे वेगवेगळे असतात, परंतु आत्महत्या केलेल्या व्यक्तीने सुसाईडमध्ये काही कारण लिहून ठेवलेले असेल, तर संबंधित व्यक्ती किंवा नातेवाईकाला पोलीस जबाबदार धरत गुन्हा दाखल करतात. परंतु कोर्टाकडून या प्रकरणाची सविस्तर चौकशी आणि शहानिशा करत निकाल देण्यात येतो. नागपूर खंडपीठाने देखील एका प्रकरणात असाच महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
लता प्रमोद डांगरे या तरुणीने दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठापुढे सुनावणी झाली. तिने तिच्या वडिलांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. प्रमोद डांगरे यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी असलेल्या या तरुणीने तिच्या आईच्या माध्यमातून वडिलांकडून वारंवार पैशांची मागणी केल्याचा आरोप होता. वर्षभरापूर्वी या तरुणीच्या पित्याने आत्महत्या करताना त एक सुसाईड नोटही लिहिली होती. त्यात त्याने याचिकाकर्त्या तरुणीवर व त्याच्या दुसऱ्या पत्नीवर सुमारे ५ लाखाच्या रक्कमेची मागणी करून मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.
याचिकाकर्ता तरुणी व तिच्या आईकडून झालेल्या कथित छळाच्या संदर्भात सुसाईड नोटमध्ये मृताची व्यथा कोर्टासमोर सुनावणीसाठी आली असता याचिकाकर्त्याच्या सांगण्यावरून झालेला कथित छळ आणि मृत व्यक्तीने उचललेले टोकाचे पाऊल यांच्यात कोणताही जवळचा संबंध नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे. याचवेळी न्यायालयाने मुलीविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा देखील रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
High Court Order Suicide Attempt
Nagpur Bench