India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

जेवणानंतर चहा पिण्याची सवय आहे? फायद्याची आहे की तोट्याची?

India Darpan by India Darpan
September 27, 2022
in राष्ट्रीय
0

 

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
काही जण फक्त सकाळी किंवा संध्याकाळी चहा न पिता दिवसभरात कधीही इच्छा झाल्यावर लगेच चहा पितात. हे चहाप्रेमी कधीकधी चहाचे इतके अतिसेवन करतात, की त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम दिसून येतो. यातील काही जणांना तर जेवल्यानंतरही चहा पिण्याची सवय असते. इतकेच नव्हे तर दुपारी जेवल्यानंतर किंवा कुठे बाहेर फिरायला गेल्यानंतर जेवण झाल्यावर चहा पिण्याच्या या सवयीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. जेवल्यानंतर चहा पिण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

सध्याच्या काळात चहाला अमृततुल्य असे म्हटले जाते. सकाळी उठले की, बहुतांश जण चहा पितात, परंतु त्याच बरोबर चहा सोबत काही जण बिस्कीट किंवा अन्य पदार्थही खातात. परंतु चहा सोबत काही खाताना निश्चितच याबाबत विचार करणे आवश्यक आहे की, ते पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट आहेत. चहामध्ये असे अँटीऑक्सिडंट असतात, जे यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. काळा आणि हिरवा चहा यकृतातील एन्झाईम्स आणि फॅट्सची पातळी सुधारण्यास मदत करतो. विशेषतः, ग्रीन-टी यकृत एंझाइम पातळी सुधारू शकते, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि यकृत चरबी कमी करू शकते.

दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये हे फार कमी जणांना माहीत आहे. यामध्ये असलेल्या कॅफीनमुळे पोटात गॅसची समस्या होऊ शकते आणि त्यामुळे पोटाशी संबंधित आजारांना बळी पडू शकता. चहासोबत काही जणांना बिस्किटं खायला आवडते. कुणाला चहासोबत ब्रेड आणि बटर खायला आवडते. तर कुणी चहासोबत खारी- टोस्ट असे पदार्थ खातात.

पावसाळी वातावरणात जर संध्याकाळचा चहा घेत असाल तर मग त्यासोबत भजी, सॅण्डविच, मॅगी किंवा असेच काहीसे खमंग पदार्थ हमखास खात्री खाल्ले जातात. पण चहासोबत किंवा चहा घेतल्यानंतर आपण लगेचच काय खाऊ नये कारण यामुळे विरुद्ध अन्न एकत्र येऊन त्यांची आपापसात रिॲक्शन होते आणि त्याचा तब्येतीवर वाईट परिणाम होतो.

आहारतज्ज्ञांच्या मते, कॅफीनचे प्रमाण जास्त असणाऱ्या सर्व गोष्टी रात्रीच्या वेळी टाळल्या पाहिजेत. चहा, कॉफी सारख्या बर्‍याच पदार्थांमध्ये कॅफीन असू शकते, याची आपल्याला माहितीही नसते, चहा प्रमाणेच सोडा आणि मिठाई व्यतिरिक्त, कॉफी चॉकलेटमध्येही कॅफीन जास्त असते. त्यामुळे झोपेच्या समस्या टाळण्यासाठी, या गोष्टींचे सेवन रात्री करू नये.

सध्या पावसाळा असून आता चहा आणि भजी हे एक जबरदस्त हिट कॉम्बिनेशन मानले जाते पण चहासोबत किंवा चहानंतर लगेचच बेसन असणारे पदार्थ खाल्ले तर चहातील टॅनिनमुळे शरीरातील पोषक घटक रक्तात मिसळण्यास अडथळा येतो. त्यामुळे चहा- भजी हे खाणे आहारतज्ज्ञांच्या दृष्टीकोनातून फारसे योग्य नाही. भारतात चहाविना सकाळ होत नाही असं म्हणतात.

चहा मध्ये कॅफिन आढळते ज्यामुळे रक्तदाब म्हणजेच ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असते त्यांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. ज्यांना आधीपासूनच हायपर टेन्शन किंवा उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी जेवल्यानंतर चहा पिणे टाळावे. जेवल्यानंतर चहा पिणे हृदयाच्या रोगासाठी हानिकारक मानले जाते. या सवयीमुळे हृदयाचे विकार होण्याची शक्यता असते.

जेवल्यानंतर चहा प्यायल्याने पचनक्रियेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच जेवल्यानंतर लगेच चहा प्यायलास जेवणातील पोषक तत्त्व मिळत नाही. चहामध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे गॅस, ॲसिडिटी असा त्रास होऊ शकतो. जेवल्यानंतर चहा प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. चहामुळे होणाऱ्या गॅस व ॲसिडिटीमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्यावी .

Health Tips Tea Drinking Habit After Dinner or Lunch


Previous Post

संपादीत जमिनीचा मोबदला देण्यात दिरगांई; वेतन अदा करणारे बँक खाते सिल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – …तर तुम्ही सतत तुडुंब रहाल

Next Post
विचारपुष्प

इंडिया दर्पण - विचार पुष्प - ...तर तुम्ही सतत तुडुंब रहाल

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group