बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संपादीत जमिनीचा मोबदला देण्यात दिरगांई; वेतन अदा करणारे बँक खाते सिल करण्याचे न्यायालयाचे आदेश

by India Darpan
सप्टेंबर 26, 2022 | 11:23 pm
in क्राईम डायरी
0
court 1

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाझर तलावासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात दिरगांई केल्याने कार्यकारी अभियंत्यासह कर्मचा-यांचे वेतन अदा करणारे बँक खाते सिल करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहे. या आदेशात कार्यकारी अभियंता,लघू पाटबंधारे विभाग यांचे बँक ऑफ बडोदा येथील अधिकारी व कर्मचा-यांना वेतन अदा करणारे करंट खाते जप्ती करण्याचे आदेश दिले. कार्यकारी अभियंत्यासह तब्बल ८२ कर्मचा-यांचे या खात्यातून वेतन अदा होत असल्याने संबधिताचा पगार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

याबाबत तक्रारदाराचे वकिल अ‍ॅड.बी.एम.पगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे लहामगेवाडी (वाडिव-हे) येथील शेतकरी भिमा भिवा जाधव यांची शेतजमिन १९८८ मध्ये पाझर तलावाकामी संपादीत करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून त्यांना भरपाई देण्यात आली. परंतू ती तुटपुंजी असल्याने जाधव यांच्यासह अन्य शेतक-यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात वाढीव भरपाईसाठी दाद मागितली होती. याबाबत २९ एप्रिल २०१४ रोजी न्यायालयाने शेतक-यांच्या बाजूने निकाल दिला. शेतक-यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता, लघूपाटबंधारे विभाग सिंचनभवन व जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करून भरपाई रक्कम मिळण्याबाबतची कागदपत्रांची पुर्तता केली. मात्र जाधव यांना भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे जाधव यांनी रक्कम वसूलीसाठी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. २०१६ मध्ये हा दावा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशान्वये कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसान भरपाईची रक्कम न दिल्याने जाधव यांनी एप्रिल २०२२ मध्ये कार्यकारी अभियंता कार्यालयातील फर्निचर जप्त केले होते. परंतू तरीही संबधितांनी रक्कम अदा करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला नाही. अखेर जाधव यांनी पुन्हा कार्यकारी अभियंता कार्यालयाविरोधात कोर्टात धाव घेतल्याने सुनावणी होवून चौकशी अंती वेळोवेळी मुदत देवूनही लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाने नुकसान भरपाई दिली नाही तसेच असमर्थता दाखविली नाही असा ठपका ठेवत जाधव यांच्या बाजूने हे आदेश दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचे फायद्याचे गणित जुळेल; जाणून घ्या, मंगळवार, २७ सप्टेंबरचे राशिभविष्य

Next Post

जेवणानंतर चहा पिण्याची सवय आहे? फायद्याची आहे की तोट्याची?

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

जेवणानंतर चहा पिण्याची सवय आहे? फायद्याची आहे की तोट्याची?

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011