मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
आपल्या भारतात सर्वच अन्नामध्ये मसाले पदार्थ वापरले जातात. कारण प्रत्येक मसाल्याचा आपल्या आरोग्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे फायदा होतो. यापैकी एक म्हणजे लवंग! लवंग हे आपल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी देखील खूप महत्वाची ठरणारी आहे. लवंग ही जेवणाचा सुगंध आणि चव तर वाढवतेच पण त्यामध्ये आरोग्याशी संबंधित अनेक गुणधर्म आहेत. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल घटक मानवाला निरोगी ठेवतात.
हाडे मजबूत बनवण्यासोबतच ते डोक्यावरील कोंडा देखील दूर करते. अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे, लवंग संसर्ग आणि हानिकारक बॅक्टेरियापासून संरक्षण करते, म्हणून ती दातदुखीसाठी प्रभावी मानली जाते, परंतु याशिवाय, त्यात असे अनेक गुणधर्म आहेत ज्याचा अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.
लवंगात व्हिटॅमिन-सी, फायबर, मॅंगनीज, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-के भरपूर प्रमाणात असतात. लवंगाचे पाणी देखील तुमचे आरोग्य सुधारू शकते. यासाठी आपल्याला लवंगाचे पाणी पिण्यास सुरुवात करावी लागेल. यामुळे तुमच्या आरोग्याचा फायदा तर होईलच पण लवंग प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत होईल.
लवंगाच्या पाण्यामुळे वजन कमी होऊ शकते, हिवाळ्यात लवंगाचे पाणी शरीरासाठी अमृतापेक्षा कमी नाही. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासोबतच लठ्ठपणा कमी करण्यातही मदत होते. लवंगाचे पाणी पोटात जळजळ होण्यापासून देखील आराम देते.
आता लवंगाचे पाणी कसे बनवायचे ते पाहू या, लवंगाचे पाणी बनवण्यासाठी प्रथम दोन लवंगा घ्या आणि एका ग्लास पाण्यात भिजवून रात्रभर ठेवा. आता सकाळी उठून हे पाणी रिकाम्या पोटी प्या. वजन कमी करण्यासाठी तुम्ही लवंग सोबत दालचिनी आणि जिरे देखील घालू शकता. त्यासाठी हे तीन मसाले भाजून त्याची पावडर तयार करा. दररोज सकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा हे मिश्रण उकळा आणि थंड झाल्यावर प्यावे. चव सुधारण्यासाठी आपण एक चमचे मध देखील घालू शकता.