मुकुंद बाविस्कर, मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
आधार कार्ड आणि पॅन कार्ड आजच्या काळात अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. यामुळे आपल्याला कोणतेही बँकिंग व्यवहार किंवा आर्थिक व्यवहार करणे सहज सुलभ होते याकरिता केंद्र सरकारने पॅन कार्ड धारकांना ३१ मार्च पर्यंत त्यांचा कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाशी लिंक करण्यास सांगितले आहे. त्यामुळे मुदतीच्या दिवसापर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर ते अवैध ठरेल. तसेच यानंतर पॅन आधार लिंक करण्यासाठी 1 हजार रुपये आकारले जातील.
सरकारने आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख यापूर्वीच अनेक वेळा वाढवली आहे आणि सध्या त्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. तुमचा पॅन-आधार निर्धारित तारखेपर्यंत लिंक केला नसेल, तर म्युच्युअल फंड, स्टॉक, बँक खाते उघडणे इत्यादी कामे करू शकणार नाही, कारण या सर्वांसाठी पॅन कार्ड वैध असणे आवश्यक आहे. एकंदरीत, जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यामुळे पॅन कार्ड लॉक झाले असेल, तर तुम्ही कोणत्याही सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही जिथे पॅन कार्ड अनिवार्य आहे.
त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने पॅन कार्ड तयार केले, मात्र यापुढे वैध नसेल, तर आयकर कायदा 1961 च्या कलम 272N अंतर्गत अशा व्यक्तीला दंड म्हणून दहा हजार रुपये भरावे लागतील असे मूल्यांकन अधिकारी निर्देश देऊ शकतात. पॅन आधार लिंक करण्याच्या अंतिम मुदतीच्या महत्त्वाच्या बोलताना सेबी-नोंदणीकृत आयकर समाधान प्रदाता कंपनी SAG इन्फोटेकचे एमडी अमित गुप्ता म्हणाले की, यापूर्वी, आधार पॅन लिंकिंगशी संबंधित नियमांमध्ये दंडाची तरतूद नव्हती. नवीन कायद्यानुसार दोन आयडी लिंक करण्यात अयशस्वी झाल्यास परिणाम होतील.
पॅन अवैध करणे म्हणजे पॅन तपशील आवश्यक असलेले आर्थिक व्यवहार करू शकत नाहीत. यामध्ये आयकर रिटर्न भरणे आणि बँक खाते उघडणे समाविष्ट आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 272B नुसार, असे म्हटले आहे व्यक्तीला अधिक TDS रक्कम भरावी लागेल आणि दंड देखील भरावा लागेल. मात्र जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले असेल, तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून तुमची स्थिती तपासू शकता.
– यासाठी तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जावे लागेल.
– डाव्या बाजूला ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा.
– तुमची स्थिती पाहण्यासाठी ‘येथे क्लिक करा’ वर क्लिक करा.
– तुमची स्थिती पाहण्यासाठी ‘येथे क्लिक करा’ या हायपर लिंकवर क्लिक करा. येथे तुमचा आधार आणि पॅन कार्ड तपशील भरावा लागेल.
– जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले असेल, तर “तुमचा पॅन आधार क्रमांकाशी लिंक झाला आहे” असे दिसेल.
– जर तुम्ही अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल, तर https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या लिंकवर क्लिक करावे लागेल.
– त्यानंतर “Link Aadhaar” वर क्लिक करा.
– यानंतर तुम्हाला तुमचा तपशील भरावा लागेल. आणि तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.
– एसएमएसद्वारे पॅनला आधारशी लिंक करा
– अॅप वापरकर्ते 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवून दोघांना सहजपणे लिंक करू शकतात.
– आधार क्रमांकाशी पॅन लिंक करण्यासाठी, वापरकर्त्याला UIDPAN प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
– उदाहरणार्थ: UIDPAN 000001112222 AAAPA7777Q. वरील क्रमांकांवर एसएमएस पाठवल्यानंतर, – दोन्ही दस्तऐवजांमध्ये तुमचे नाव आणि जन्मतारीख एकच असल्यास आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी जोडला जाईल.