India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या पॅनकार्डचे काय करायचं?

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पॅनकार्ड हा महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. प्रत्येक कामासाठी पॅनकार्ड मागितले जाते. खासकरुन आर्थिक व्यवहारासाठी तर हा जणू काही गेटपास असतो. बँकेत खाते उघडा, डीमॅट खाते उघडा, कर्ज काढा क्रेडिट कार्ड आणिक ब-याच कामात पॅन कार्डचा पुरावा सादर करावा लागतोच. पण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या पॅनकार्डचे करायचं का? याविषयी प्राप्तिकर खात्याने काही नियम तर केलाच असेल? मृत्यूनंतर पॅनकार्ड नातेवाईकांकडे जमा करण्यात येते की आयकर विभागाकडे जमा करण्यात येते. चला तर माहिती घेऊ या…

एखाद्या व्यक्तिचा मृत्यू झाला तर त्याविषयीचा पॅनकार्डसंदर्भातील नियम निश्चित करण्यात आला आहे. अशावेळी ते पॅनकार्ड निष्क्रिय करणे अथवा प्राप्तिकर खात्याकडे परत करावे लागते. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्ती, जिच्याकडे पॅनकार्ड आहे, तिचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे पॅनकार्ड परत करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित खात्याकडे एक अर्ज करावा लागतो आणि त्यात पॅनकार्ड परत करण्याचे कारण स्पष्ट करावे लागते. त्यानंतर मयत व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, पॅनकार्डची सत्यप्रत, क्रमांक यासोबत मृत्यू प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडून पॅनकार्ड परत करावे लागते.

एक गोष्ट लक्षात ठेवा की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर लगेच पॅनकार्ड परत करण्याची घाई अजिबात करु नका. या व्यक्तिच्या पॅनकार्डचा वापर अनेक आर्थिक कामांसाठी करावा लागतो. अशावेळी संबंधित सर्व आर्थिक कामे पूर्ण झाल्याशिवाय पॅनकार्ड परत करु नका. त्यासाठी थोडा कालावधी जाऊ द्यावा. अलिकडच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरून लोकांना सायबर गुन्ह्यांचे बळी बनवले जाते.

कोणत्याही नातेवाईकाचे पॅनकार्ड सरेंडर करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला असेसमेंट अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल. अर्ज लिहिल्यानंतर, पॅन कार्ड सरेंडर करण्याचे कारण देखील द्यावे लागेल. यासोबतच मृत व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, मृत्यू प्रमाणपत्र, पॅन क्रमांक इत्यादी सर्व माहितीही लिहावी लागेल. या अर्जासोबत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडून ते सादर करावे. जर असे वाटत असेल की मृत व्यक्तीच्या पॅनकार्डचा तुम्हाला भविष्यात काही उपयोग होऊ शकतो, तर अशा परिस्थितीत तुम्ही पॅन कार्ड देखील ठेवू शकता. मृत व्यक्तीचे पॅनकार्ड सरेंडर करणे बंधनकारक नाही. पण, पॅन कार्डचा गैरवापर होणार नाही याची विशेष काळजी घ्या, त्यामुळे त्याचा डेटा सुरक्षित ठेवा.

Guide After Death Pan Card What to Do


Previous Post

सकाळी उठल्यावर तोंड धुण्याआधी पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे

Next Post

‘माझी पत्नी हो दरमहा २५ लाख देतो’ व्यावसायिकाने या अभिनेत्रीला दिली होती ऑफर

Next Post

'माझी पत्नी हो दरमहा २५ लाख देतो' व्यावसायिकाने या अभिनेत्रीला दिली होती ऑफर

ताज्या बातम्या

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

February 3, 2023

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group