India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सकाळी उठल्यावर तोंड धुण्याआधी पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र


मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पाणी म्हणजे जीवन होय. प्रत्येक सजीव जिवाला पाण्याची गरज असते. मनुष्य प्राणी हा पाण्याविना राहू शकत नाही, त्यातच उन्हाळ्यात तर प्रत्येक जण वारंवार पाणी पितो. पाणी पिणे हे आपले रोजचे काम आहे. पाणी पिणे ही कदाचित सर्वात सोपी क्रिया आहे. परंतु आजच्या काळात अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात चहासारख्या गरम पेयाने करतात. तोंड धुतल्यानंतर आपण हा आनंद लुटतो. मात्र, आपण आपल्या दिवसाची सुरुवात दात घासण्याच्याही आधी रिकाम्या पोटी पाणी पिऊन करावी, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

चांगले आरोग्य आणि सुंदर त्वचेसाठी अनेक जण जास्त पाणी पितात याबद्दल आपण सर्वांनी ऐकले आहे. दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिण्याची शिफारस केली जात असली तरी, त्यापेक्षा जास्त काहीही हानिकारक परिणाम करू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्या.पाणी म्हणजे जीवन होय. मानवी जीवनात पाण्याचे अत्यंत महत्त्व आहे. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी आणि पोषक तत्व शरीरात पोहोचवण्यासाठी पाण्याची गरज असते. त्याच बरोबर शरीरात उर्जा टिकवून ठेवण्यासाठी देखील पाणी खूप महत्वाचे आहे.

आयुर्वेदानुसार प्राचीन भारतीय वैद्यक व्यवस्थेत असे सांगितले आहे की, काही गोष्टींची काळजी घेतली. तरच पुरेसे पाणी पिण्याचे फायदे मिळू शकतात. काही जण दिवसभर केवळ एक -दोन ग्लास पाणी पितात, त्यांना हळूहळू आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होऊ लागतात. तसेच चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने प्रथम पचनक्रिया बिघडते.

पोषक तत्वांच्या शोषणासाठी अन्नाचे योग्य पचन होणे अत्यंत आवश्यक आहे. जेवण सुरू करण्यापूर्वी जास्त पाणी पितात किंवा जेवणा दरम्यान कमी प्यायले तर ते पचन बिघडू शकते. आयुर्वेदानुसार असे केल्याने त्याचा थेट परिणाम पोटातील अन्नाच्या स्थितीवर होतो. जेवताना नियमित पाणी प्यायल्यानेही लठ्ठपणा येऊ शकतो.

सर्व प्रथम, एका वेळी एकदम पाणी पिऊ नका. हळुहळू प्या, रात्रभर झोपल्याने आपल्या तोंडामध्ये अनारोग्यकारक जिवाणू वाढतात. आपण सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्यास हे जिवाणू गिळले जातात व पोटात नष्ट होतात. तोंड धुण्यापूर्वी थेट पाणी प्यायल्यास तोंडातील लाळही पोटात जाते. यामुळे शरीराला फायदा होतो. कारण लाळेतील काही घटक पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदतच होते.

सकाळी रिकाम्या पोटी पाणी घेतल्याने पचनक्षमता वाढते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. उच्च रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते. सकाळीच प्यायलेल्या पाण्यामुळे मुखारोग्य चांगले राहिते. तोंडाची दरुगधी कमी होते. त्यामुळे तोंडात लाळेअभावी आलेला कोरडेपणा दूर होतो. या कोरडेपणामुळे विविध समस्या निर्माण होऊ शकतात. सकाळी पोट साफ होण्यास मदत होते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते सकाळी दात घासण्याआधीच पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. दिवसभरही योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान संतुलित राहते व नको असलेले घटक शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात लाळनिर्मिती होते. लाळेने पचनक्रिया चांगली होण्यास मदत होऊन शरीरातील विविध अवयवांना आवश्यक पोषक घटक मिळतात.

Health Tips Water Drinking Morning before Mouth Wash Benefits


Previous Post

तब्बल ११६६ सरकारी पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Next Post

मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या पॅनकार्डचे काय करायचं?

Next Post

मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या पॅनकार्डचे काय करायचं?

ताज्या बातम्या

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 3, 2023

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group