मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) बॉलीवूड म्हणजेच हिंदी सिनेसृष्टी हे एक मायाजाल समजले जाते, तिथे काम मिळवण्यासाठी देशभरातून शेकडो तरुण-तरुणी दररोज येत असतात. परंतु सर्वांनाच काम मिळते असे नाही त्याचप्रमाणे त्यांना काम मिळवण्यासाठी अनेकदा अयोग्य मार्ग देखील अवलंब व्हावा लागतो, असे म्हटले त्यामुळेच विशेषतः नवीन अभिनेत्रींविषयी चांगले बोलले जात नाही, इतकेच नव्हे तर नवी असो की जुनी या अभिनेत्रींच्याकडे वाईट नजरेने बघितले जाते, असाच प्रकार नुकताच घडला. एका अभिनेत्रीला चक्क एक वेगळीच ऑफर देण्यात आली होती, त्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अभिनेत्री नीतू चंद्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. एका व्यावसायिकाने नीतूला त्याची पत्नी बनण्यासाठी ऑफर दिल्याचं तिने सांगितलं. यासाठी तो तिला दरमहा 25 लाख रुपये देईल, असे म्हणाला होता. या मुलाखतीत नीतूने तिच्या करिअरविषयीसुद्धा नाराजी व खंत व्यक्त झाली. 13 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसोबत काम करूनसुद्धा आता तिच्या हातात काम आणि पैसा नसल्याचे तिने सांगितले.
विशेष म्हणजे एका ऑडिशनमध्ये कास्टिंग डायरेक्टरने नितूला तासाभरात रिजेक्ट केल्याचा किस्साही तिने यावेळी सांगितला. नीतूने 2005 मध्ये ‘गरम मसाला’ या चित्रपटातून या क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एअर होस्टेसची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ट्रॅफिक सिग्नल, वन टू थ्री, ओय लकी लकी ओय, अपार्टमेंट 13 बी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे
मुलाखतीत नीतू पुढे म्हणाली की, माझी कथा म्हणजे एका यशस्वी अभिनेत्रीची अयशस्वी ठरलेली कथा आहे. मला एका मोठ्या व्यावसायिकाने वाईट ऑफर दिली होती एवढे चांगले काम करूनसुद्धा इंडस्ट्रीत माझी काहीच किंमत नसल्यासारखे मला वाटते, कारण एका कास्टिंग डायरेक्टरने ऑडिशनदरम्यान अवघ्या तासाभराच्या आत मला सांगितले की, नीतू मला माफ कर पण मी तुला भूमिका देऊ शकत नाही.
विशेष म्हणजे नीतूने ‘नेव्हर बॅक डाऊन: रिव्हॉल्ट’ या हॉलिवूड चित्रपटातही काम केले असून इंडस्ट्रीविषयी नीतूने याआधी दिलेल्या मुलाखतीतही राग व्यक्त केला होता. काही जणांना माझ्याबद्दल खूप आश्चर्य वाटते की, मी माझ्या स्वतःच्या बळावर हॉलिवूड प्रोजेक्ट कसा मिळवला? त्यांना धक्का बसतोय की कोणाचाही पाठिंबा नसताना मी इतकी पुढे कशी जाते. तसेच नितूही ‘कुछ लव्ह जैसा’ या चित्रपटात शेवटची झळकली. ओय लकी लकी ओय या चित्रपटाला सर्वांत लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
Bollywood Actress Neetu Chandra Businessman Offer Wife 25 Lakh per Month