इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंडमधील जामतारा येथील सरकारी शाळांना रविवार ऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी दिल्याची धक्कादायक बा उजेडात आली आहे. नमाजसाठी हा बदल करण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जामतारा जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये स्थानिक मुस्लिमांच्या दबावाखाली रविवारची साप्ताहिक सुट्टी बदलून शुक्रवार करण्यात आली आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामतारा येथील कर्मतांड आणि नारायणपूर गावातील प्राथमिक शाळांमध्ये साप्ताहिक सुट्टी बदलण्यात आली आहे. या शाळांमध्ये अनेक जाती आणि धर्मातील मुले शिकतात. त्यात ७० टक्के विद्यार्थी मुस्लिम कुटुंबातील आहेत. शुक्रवारी शाळा बंद ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे मुस्लिम समुदायाच्यावतीने शुक्रवारची नमाज अदा केली जाते. या शाळांच्या सूचना फलकावरही साप्ताहिक सुट्टीतील बदलाचा उल्लेख करण्यात आला आहे.
शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात १ हजार ८४ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी केवळ १५ शाळांची नोंदणी उर्दू शाळांच्या नावावर आहे. तथापि, ग्रामशिक्षण समिती आणि स्थानिक लोकांच्या दबावामुळे इतर डझनभर शाळांचे उर्दू शाळांमध्ये रूपांतर करण्यात आले. या शाळांच्या नावांना पुढे ‘उर्दू’ हा शब्द जोडण्यात आला आहे.
उर्दू नाव आणि सुटीतील बदलाचे वृत्त समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने हेमंत सोरेन सरकारवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी शिक्षक काहीही बोलण्याचे टाळत आहेत. तर. आपल्याकडे अशी कोणतीही माहिती नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आता उपायुक्त फैज अहमद यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण प्रकरण तपासानंतरच कळेल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
Government School Weekly Holiday Change for Namaj Controversy Jharkhand