गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुलं प्रेमींसाठी खुषखबर जगभरात होणार पुलंच्या स्मृतींचा जागर; असे आहे भरगच्च नियोजन

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2022 | 2:10 pm
in इतर
0
IMG 20221109 WA0014

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ’आशय सांस्कृतिक’च्या वतीने व ’पु. ल. परिवार’च्या सहयोगाने गेली २० वर्षे अव्याहतपणे पुलोत्सवाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्राला अभिमानास्पद असलेला आणि भारतातील अनोखा असा हा कला महोत्सव आहे. आता हा महोत्सव ’ग्लोबल पुलोत्सव’ झाला असून आज पुलंच्या जन्मदिनी भारतातील सुमारे 23 शहरांत आणि 5 खंडांमधील महत्वाच्या शहरांमध्ये आयोजित करण्याचा मानस व्यक्त करतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

पुलोत्सव म्हणजे जगभरातील मराठी मनांचा केवळ आनंद सोहळा नसून साहित्य विश्वातील एक अभूतपूर्व योग आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे! पुलंनी आपल्या अष्टपैलू गुणांनी स्वत: तर कलांचा आस्वाद घेतलाच …. पण अनंत हस्तांनी तो आनंद द्विगुणित करुन रसिकांवर त्याची उधळण केली. जे जे कलासौंदर्य पुलंना भावले, त्याचा परिचय त्यांनी करुन दिला…. ज्यासाठी जगावं अशा अनेक गोष्टींवर त्यांनी स्वत: प्रेम केलंच; पण जगण्याचा आनंद घेण्यासाठी कलेशी मैत्री करायलाही शिकवलं! चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य व अन्य कलांचा अभिजात आविष्कार म्हणजे पुलोत्सव! पुलंबद्दलचा आदर व्यक्त करणारा आणि सर्वाधिक कला प्रकारांना स्पर्श करणारा एकमेव महोत्सव म्हणजे ’पुलोत्सव’!

पु. ल. जेव्हा 80 वर्षांचे झाले, तेव्हा पुण्यात या निमित्ताने ’बहुरुपी पु.ल.’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते (8 नोव्हेंबर 1999). दुर्दैवाने यानंतर पुलंचे निधन झाले. पुलंना खर्‍या अर्थी श्रध्दांजली अर्पण करायची असेल तर त्यांचे बहुरुपित्व परावर्तित करणार्‍या ’पुलोत्सव’ सुरु करण्याची परवानगी आम्ही सुनीताबाईंकडे मागितली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच ’पुलोत्सव’ गेली 20 वर्षे अव्याहतपणे पुण्यात चालू आहे. ’ग्लोबल पुलोत्सवात’ पु. ल. परिवार सहभागी होत आहे, याचा आम्हांस विशेष आनंद आहे.

’ग्लोबल पुलोत्सव’ म्हणजे निव्वळ महोत्सव असणार नाही……, तर या माध्यमातून पुलंचे शब्द ….., त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तसेच सर्जनशील अभिरुची संपन्नता यांचा ठेवा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक अभिजात प्रयत्न असणार आहे. रोजच्या जीवनातून हद्दपार होत असलेल्या ’विनोदाचे’ महत्त्व या निमित्ताने भावी तरुणपिढी पर्यंत पोहोचावे या दृष्टीने महोत्सवाचे आयोजन जगभर करीत आहोत.

वर्षभर साजरा होणार्‍या ग्लोबल पुलोत्सवाची वैशिष्ठ्ये :
-’ग्लोबल पुलोत्सव’ 8 नोव्हेंबर 2022 ते 8 नोव्हेंबर 2023 रोजी जगभरात संपन्न होईल.
– यानिमित्ताने प्रत्येक शहरात मान्यवरांची ’सल्लागार समिती’ तर पु.ल. प्रेमी आणि संस्थांची ’कार्य समिती’ तयार करण्यात येईल.
– विविधरंगी कार्यक्रमांमधून स्थानिक कलाकारांना संधी देण्यात येईल.
– वर्षभरातील पुलोत्सवात सुमारे 1000 कलाकार, साहित्यिक आणि प्रमुख पाहुणे सहभागी होतील.
– परंपरेनुसार प्रत्येक शहरातील पुलोत्सवात, ’पु. ल. स्मृती सन्मान’, ’पु. ल. जीवनगौरव सन्मान’, ’पु. ल. कृतज्ञता सन्मान’ आणि ’पु. ल. तरुणाई सन्मान’ प्रदान करण्यात येतील.
– यानिमित्ताने पुलंवरील दर्जेदार पुस्तक आणि लघुपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.
– महाराष्ट्रातील अनेक व्यंग चित्रकारांनी पुलंच्या साहित्यावर अधारलेल्या अर्कचित्रांचे प्रदर्शन, हे महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे.
– पुलंचे कवीत्व व विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी ’आय लव्ह पी.एल.’ या शीर्षकाखाली शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
– केंद्र सरकार, राज्य सरकार, पु. ल. कलाअकादमी, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, फिल्मस् डिव्हिजन, जगभरातील महाराष्ट्र मंडळ आणि मराठी भाषेसाठी कार्यरत संस्थांच्या सहभागाचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

’पुलोत्सवा’तील संभाव्य कार्यक्रम :
– बहुरंगी, बहुढंगी कार्यक्रमांनी पुलोत्सव रंगणार आहे. चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य व अन्य कलांविषयक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात असणार आहे. तरुण आणि स्थानिक कलाकारांच्या सहभागाने पुलोत्सव सजणार आहे. पुलंना भावलेल्या चित्रपटांचा महोत्सव, त्यांच्या अजरामर नाटकांचे सादरीकरण, सदाबहार कथांचे प्रस्तुतीकरण, पुलंनी सादर केलेल्या अभिजात कलाविष्काराचे पुनरुज्जीवन (बैठकीची लावणी, रवींद्रनाथ टागोर, ’कवितांजली’, बा. भ. बोरकर-मर्ढेकर इ.) विशेष दृक्-श्राव्य कार्यक्रम (’गुणगाईन आवडी’, ’बहुरुपी पु. ल.’, ’पुलंची दैवतं’, पुलंची भाषणे इ.) त्याचप्रमाणे पुलंच्या पुस्तकांचे-सी.डीं.चे प्रदर्शन या आणि अशा अनेक कार्यक्रमांचा अंतर्भाव पुलोत्सवात असणार आहे.

महाराष्ट्राबरोबरच भारतातील ग्लोबल पुलोत्सवाची संभाव्य शहरे :
’अ’ शहरे : 1. पुणे, 2. मुंबई, 3. ठाणे, 4. कोल्हापूर, 5. नाशिक, 6. चंद्रपूर, 7. नागपूर, 8. इंदौर, 9. बडोदा, 10. बेंगलोर, 11. हैद्राबाद,12. दिल्ली,13. अहमदाबाद, 14. पणजी,15. फोंडा/मडगांव इ
’ब’ शहरे : 1. जळगाव, 2. सांगली-मिरज, 3. रत्नागिरी, 4. औरंगाबाद, 5. सोलापूर, 6. अमरावती, 7. यवतमाळ, 8. पिंपरी-चिंचवड, 9. बेळगाव
पाच खंडांमधील ग्लोबल पुलोत्सवाची संभाव्य (अ)शहरे :
– युरोप : लंडन, नेदरलँड्स, म्युनिच इ.
– आशिया : दुबई, सिंगापूर, मॉरिशस, बँकॉक, मलेशिया, कतार, अबुधाबी इ.
– अमेरिका : सॅन फ्रान्सिस्को, सॅनहोजे, ऑस्टिन, वॉशिंग्टन, अटलांटा, बोस्टन, कॅलिफोर्निया, राले, न्यूयॉर्क, सिअ‍ॅटल, शिकागो, ह्यूस्टन, लॉस एंजलिस, फ्लोरिडा इ.
– कॅनडा : माँन्ट्रियल, टोरॅन्टो, व्हॅकुव्हर इ.
– आफ्रिका : नैरोबी, टांझानिया, जोहान्सबर्ग इ.
– ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड : सिडनी, मेलबोर्न, ऑकलंड इ.

Global Mahotsav Worldwide Programs

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एचएएल एप्लॉईज सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आदर्श पॅनलची प्रचारात आघाडी

Next Post

पीएचडीसाठी आता याची गरज नाही; UGCने प्रसिद्ध केले हे नवे नियम

India Darpan

Next Post
UGC

पीएचडीसाठी आता याची गरज नाही; UGCने प्रसिद्ध केले हे नवे नियम

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011