नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या १२ नोव्हेंबरला एचएएल एप्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. ची पंचवार्षिक निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत यावेळी एचएएल युनियनचे जनरल सेक्रेटरी संजय कुटे, अध्यक्ष अनिल मंडलिक, कार्याध्यक्ष प्रविण तिदमे यांच्या नेतृत्वाखाली श्री आदर्श पॅनलची स्थापना करण्यात आलेली आहे व नवीन सभासदांना संधी देऊन निवडणुकीत उतरविण्यात आलेले आहे. सभासदांचे प्रश्न सभासदांनीच सोडवण्यासाठी या पॅनलने निवडणुकीत सर्व नवीन सभासदांना संधी दिलेली आहे. यामुळे सोसायटीच्या कार्यप्रणालीत नक्कीच नवीन बदल घडविण्याचा आणि पारदर्शकतेचा कारभार होण्याचा विश्वास या उमेदवारांमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे्. पॅनलच्या नावाप्रमाणेच आदर्श, प्रामाणिक, जबाबदार आणि एकनिष्ठ उमेदवार ही निवडणूक लढवत आहे. यात सर्वसाधारण गटातून अमॄतकर महेंद्र शिवाजी, अहिरे गणेश पद्माकर, अहिरे प्रशांत तुकाराम, कदम पवन गुलाबराव, टिळेकर सुनील विठ्ठल, नाडे योगेश रमेश, रिकामे कैलास तुकाराम, लांडे कैलास भाऊसाहेब, सातपुते सुशिल रमेश, सानप राजेंद्र मधुकर, अनुसूचित जाती जमाती गटातून देवरे प्रविण विनायक, भटक्या जाती/विमुक्त जमाती/विमाप गटातून कातकाडे प्रविण खंडेराव, इतर मागास प्रवर्गातून खोडे सोपान राजाराम, महिला राखीव गटातून अहिरे सुप्रिया गणेश, साळवे निर्मला विकास यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.