India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

खाद्य तेलाबाबत एफडीए आक्रमक; सणासुदीत होणार कठोर कारवाई

India Darpan by India Darpan
September 24, 2022
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकदा वापरून झालेल्या खाद्यतेलाचा वारंवार वापर करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे व्यावसायिकांच्या खाद्यतेलाची तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीवेळी जर एखादया अन्न व्यावसायिकांच्या खाद्यतेलातील घातक पदार्थाचे (पोलर कंपाऊन्ड) प्रमाण टीपीसी मशिनद्वारे २५ टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आले तर अशा व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात येईल. तेव्हा व्यावसायिकांनी खाद्यतेलाचा वारंवार पुर्नवापर करु नये. असे आवाहन अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सं. पां. शिंदे यांनी केले आहे.

उपाहारगृहे, फेरीवाले व इतर लहान-मोठे व्यावसायिक तयार अन्नपदार्थांची विक्री करतात. खाद्यतेलाच्या वारंवार पुर्नवापरामुळे त्यामधील पोषक मुल्य कमी होवून घातक पदार्थांचे प्रमाण वाढते. या पदार्थामुळे घशाचे आजार, कोलेस्टेरॉल वाढणे यासारख्या गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते.

संपूर्ण भारतात ५ ऑगस्ट २०११ पासून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ या एकच अन्नविषयक कायदयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्याच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जिल्हास्तरावर शिबिर / कार्यशाळा, वृत्तपत्र प्रकाशन, प्रशातफेरी, व्यसनमुक्ती शपथ, कमी तेल-कमी मीठ कमी साखर याबाबत जनजागृती, व्हिडीओ-रेडिओ टॉक तसेच पोस्टर्स या माध्यमांचा वापर केला जातो. परवानाधारक व नोंदणीधारक आस्थापनांनी, अन्न व्यावसायिकांनी (अन्न उत्पादक, वितरक, घाउक, किरकोळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक इत्यादी) विक्री बिलावर एफएसएसएआय अंतर्गत घेतलेला परवाना/नोंदणी प्रमाणपत्र याचा क्रमांक नमूद करणे कायदयाने बंधनकारक आहे.

यापूर्वी परवाना/नोंदणी घेतले आहेत. अशा व्यावसायिकांनी अर्जामध्ये स्वतःचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी दिला नसेल तर, अथवा काही सल्लागार (ऑनलाईन सुविधा देणारे व्यक्ती) यांचेकडून अर्ज करतानाचा युजर आयडी व पासवर्ड अन्न व्यावसायिकांनी स्वत:चा दिला नसेल तर अशा व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधून स्वतःचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्यावत करुन घ्यावेत. यापुढे सर्व अन्न आस्थापनेच्या तपासण्या या ऑनलाईन प्रणालीव्दारे केल्या जाणार असून फसवणूक व इतर गैरप्रकार टाळणेसाठी हे आवश्यक आहे. असे आवाहनही श्री.शिंदे यांनी केले आहे.

Food and Drug Administration Festive Edible Oil
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD


Previous Post

पुण्यात शालेय मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; पालकांमध्ये चिंता

Next Post

किरकोळ कारणातून बेदम मारहाण करुन महाविद्यालयीन तरूणावर चाकू हल्ला, तरुण जखमी

Next Post
प्रातिनिधीक फोटो

किरकोळ कारणातून बेदम मारहाण करुन महाविद्यालयीन तरूणावर चाकू हल्ला, तरुण जखमी

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group