India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने मिळणार कर्ज; सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गोदाम विकास नियामक प्राधिकरणाने एका कार्यक्रमात राष्ट्रीयीकृत बँकेबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. प्रोड्यूस मार्केटिंग लोन – उत्पादन विपणन कर्ज नावाच्या नवीन कर्ज उत्पादनाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.केवळ ई-एनडब्ल्यूआरएस (इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसीप्ट) वर हे कर्ज देण्यात येणार असून शून्य प्रक्रिया शुल्क, कोणतेही अतिरिक्त अनुषंगिक तारण नाही आणि आकर्षक व्याजदर यासारख्या वैशिष्ट्यांसह हे कर्ज असेल.

या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट ठेवीदारांना लाभांची माहिती देणे, तसेच भारतातील कृषी विषयक वित्तपुरवठा सुधारण्यासाठी व्यापकता वाढवणे हे आहे. ई-एनडब्ल्यूआर स्वीकारल्यानंतर लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या ऋण उत्पादनाचे दूरगामी परिणाम दिसतील अशी कल्पना आहे. उत्पादनाला उत्तम भाव जारी करण्याद्वारे ग्रामीण ठेवीदारांच्या वित्तीय सुविधेवर लक्षणीय परिणाम घडवून आणण्याची क्षमता या योजनेत आहे. ई-एनडब्ल्यूआर प्रणालीची अंतर्गत सुरक्षिततेसह, उत्पादन विपणन कर्ज योजना, येत्या काळात ग्रामीण तरलता सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात परिवर्तनकारी ठरेल. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत हा सामंजस्य करार करण्यात आला.

ग्रामीण पत पुरवठा सुधारण्यासाठी गोदामाच्या पावत्या वापरून कापणीपश्चात वित्तपुरवठा करण्याच्या महत्त्वावर या कार्यक्रमादरम्यान थोडक्यात चर्चा झाली. या क्षेत्रातील कर्जवितरण संस्थांसमोर असलेल्या जोखमीबद्दल बँकेच्या प्रतिनिधींनी माहिती दिली. भागधारकांमध्ये विश्वासाहर्ता वाढीस लागावी या उद्देशाने संपूर्ण नियामक समर्थन देण्याचे आश्वासन गोदाम विकास नियामक मंडळाने दिले आहे.


Previous Post

परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका

Next Post

मनमाड नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग; आगीने रौद्ररूप धारण केले

Next Post

मनमाड नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग; आगीने रौद्ररूप धारण केले

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group