मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड पासून ४ किमी अंतरावर दहेगाव शिवारात असलेल्या नगर परिषदेच्या कचरा डेपोला मध्यरात्री नंतर भीषण आग लागली आहे. पालिकेचे अग्निशमन दलाचे दोन्ही बंब नादुरुस्त असल्यामुळे बादल्याने पाणी आणून कर्मचारीने अगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे तिच्यावर नियंत्रण मिळविता आले नाही. रात्रीपासून लागलेली आग अजून ही धूमसत असून धुराचे लोट सर्वत्र पसरत आहे. आगीचे कारण अस्पष्ट असल्यामुळे आग लागली की लावण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.